Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. प्रत्येक वडिल आपल्या मुलीच्या आनंदासाठी वाट्टेल ते करतो. सध्या असाच एक बापलेकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांनी मुलीसाठी घरच्या घरी amusement park ची सोय केली आहे. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? तर त्यासाठी तु्म्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
सोशल मीडियावर वडील आणि मुलीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवा दाखणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मुलीबरोबर मस्ती करताना तर कधी मुलीबरोबर डान्स करताना तुम्ही वडिलांना पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल कारण या व्हिडीओत वडिलांनी घरबसल्या चिमुकल्या मुलीला amusement park ची सैर करून दिली. व्हिडीओ पाहून तुम्हीही घरबसल्या हा जुगाड करू शकता.

वडिलांचा जुगाड

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वडिलांनी आपल्या पायावर एक टोपली ठेवली आहे आणि टोपलीमध्ये चिमुकल्या मुलीला बसवले आहे. या दोघांच्या समोर टिव्ही लावला आहे. टिव्हीवर थ्रीडीमध्ये रोलर कोस्टर रायडिंग (roller coaster ride)दिसत आहे. जसा राइडवर जसा रस्ता दिसतो तसे वडील मुलीची टोपली वळतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. घरच्या घरी Amusement park चा जुगाड पाहून तुम्हालाही मजा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Shocking Stunt Video
VIDEO : लायटरबरोबर नको ती स्टंटबाजी! क्षणार्धात चेहऱ्याने घेतला पेट अन्…पुढे काय घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Happy Propose Day pilot proposed to girlfriend in plane at thousands of feet emotional viral video
लव्ह इज इन द एअर! हजारो फूट उंचीवर विमानात पायलटने केलं हटके गर्लफ्रेंडला प्रपोज; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “सर्वात नशीबवान मुलगी”
small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
mother threw the little baby in the swimming pool
“अगं आई ना तू?”, पोटच्या लेकराला स्विमिंग पूलमध्ये फेकलं; VIDEO पाहताना चुकेल काळजाचा ठोका
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

हेही वाचा : बापरे! लॅपटॉप उघडून भर रस्त्यावर स्कुटी चालवत होता तरुण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भाऊ आयटी कंपनीत..”

पाहा व्हायरल व्हिडीओ

BoB_can_BUILD या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बापाच्या कल्पकतेमुळे घरच्या घरी Amusement park चा थरार अनुभवायला मिळाला मुलीला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर” अनेक युजर्सना वडिलांचा हा जुगाड खूप आवडला आहे. काही युजर्सनी व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader