सोशल मीडियावर दररोज बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मनोरंजन करणारे असतात तर काही अनपेक्षित संकटांपासून सावध करणारे. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एका बिघडलेल्या नळातून सर्वत्र पाणी उडत असल्याचे दिसत आहे. या बिघडलेल्या नळामुळे प्रवाशांची कशी पंचाईत झाली हे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आईला घरकामात मदत करण्यासाठी बनवलेला रोबोट होतोय Troll; नेटकरी म्हणाले ‘तंत्रज्ञान पुरुषसत्ताक विचारसरणी…’

या बिघडलेल्या नळातील पाणी इतक्या वेगाने बाहेर येत आहे की, त्यामुळे रेल्वेतील प्रवासी देखील भिजताना दिसत आहेत. ‘प्लॅटफॉर्मवरील बिघडलेल्या नळामुळे प्रवाशांना मोफत अंघोळ करण्याची संधी मिळत आहे’ अशा कंमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी ‘रेल्वेच्या दरवाज्यात लटकणाऱ्यांसाठी हा चांगला धडा असल्याची कमेंट केली आहे. याउलट काही जणांनी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असणाऱ्या लोकांवर राग व्यक्त केला आहे, ‘एखाद्या फडक्याने पाणी थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असणारे लोक व्हिडिओ काढण्यात व्यग्र आहेत’ अशी संतप्त प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.