जंगलातून किंवा शेतात फिरत असताना अचानक समोर साप दिसल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अशातच जर एखादा विषारी सापाशी तुम्ही पंगा घेतला तर मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. पण सोसयटीत सापांचा वावर वाढल्यास लोक सर्पमित्रांना संपर्क साधून साप पकड्यास सांगतात. कारण सर्पमित्र अतिशय काळजीपूर्वक सापांना पकडतात आणि त्यांना जंगलात सोडतात. अशाच प्रकारचा सापाचा एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका सर्पमित्र तरुणीने सोसायटीत घुसलेल्या रॅट स्नेकला सहज पकडलं. रॅट स्नेक धामण जातीच्या सापासारखा दिसतो. पण या तरुणीने हिंमत दाखवून या सापाला पकडलं. तरुणीचा साप पकडण्याची पद्धत पाहून लोकही थक्क झाले. कारण या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सोसायटीत असलेल्या एका किराणा दुकानात घुसलेला मोठा साप या तरुणीने पकडला. तरुणी सर्पमित्र असल्याने या सापाला तिने सहज हाता गुंडाळलं आणि बॉक्समध्ये टाकलं. साप पकडण्याची तरुणीची हिंमत पाहून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
@shweta_wildliferescuer या इन्स्टाग्राम पेजवर सापाचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रियांचा वर्षाव करत या तरुणीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, मलाही साप पकडायला शिकवा. कधीतरी याचा फायदा होईल.