Viral resignation letter: एक वेळ चार पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जिथे स्वाभिमानाला ठेच पोहोचते अशा ठिकाणी काम करणार नाही. अशी काही लोकांची भूमिका असते. अनेकदा अशी मंडळी आपल्या कृतीमधून लोकांचं लक्ष वेधून घेतात.याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बॉसमुळे आणि कंपनीतील वर्क कल्चरमुळे तरुणी नैराश्येत जाण्याच्या मार्गावर होती. म्हणूनच नोकरी सोडताना तिने अशी काही कृती केली की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. याआधीही तुम्ही अनेक राजीनामे पाहिले असतील मात्र या तरुणीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून दिलं आहे. ‘मला स्वतःला अगदी टॉयलेट पेपर सारखं वागणूक देण्यात आली. जेव्हा गरज पडली तेव्हा वापर केला आणि नंतर कोणताही विचार न करता फेकून दिलं.’ हे फक्त एक वाक्य नाही तर कर्मचाऱ्याने व्यक्त केलेली भावना आहे. सध्या एका टॉयलेट पेपरवर लिहिलेला राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सिंगापूरमधील एका महिलेने लिंक्डइनवर एक राजीनामा शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे. या कंपनीने माझ्याशी कसे वागले याचे प्रतीक म्हणून मी माझ्या राजीनाम्यासाठी या प्रकारचा कागद निवडला आहे. असं ती सांगते.एंजेलाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपल्या कर्मचाऱ्यांशी इतके चांगले वागा की, ते कधी कंपनी सोडतील तेव्हा ते नाराज नाही तर आभार मानतील.

या राजीनाम्याने ती पूर्णपणे हादरुन गेली आहे. तिने स्वतःला एक प्रश्न विचारला की, माझी कंपनी एखाद्या व्यक्तीला फक्त त्याच्या कामाच्या स्वरुपातच ओळखते का? जर एखादी व्यक्ती कृतज्ञतेच्या भावनेने नोकरी सोडत असेल तर त्या व्यक्तीची निष्ठा कमी झाली असं नाही. तर कंपनीच्या संस्कृतीमध्ये या गोष्टीमुळे ताकदच वाढते. कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन त्यांना आपल्या कंपनीत थांबवणे ही योग्य पद्धत नाही तर त्या कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीत माणूस म्हणून वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कौतुकाचे छोटे छोटे शब्द मोठे बदल करु शकतात असंही की म्हणाली.

पाहा राजीनामा

नोकरी हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे साधन आहे, परंतु ते आपल्या संपूर्ण आयुष्यापेक्षा अधिक महत्त्वाचे नाही. नोकरी आपल्याला आर्थिक स्थिरता आणि सामाजिक संबंध देऊ शकते, पण ती आपल्या वैयक्तिक जीवन, कुटुंबासोबत वेळ घालवणे, आरोग्य आणि आनंदाला महत्त्व देण्याला पर्याय नाही. नोकरी आणि जीवन यांच्यात संतुलन असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकू.