Viral video: भारतात लग्न या गोष्टीला खूप महत्त्व देण्यात येतं. लग्नाच्या जोड्या या स्वर्गात जुळतात, असं म्हटलं जातं. मात्र, कित्येक वेळा काही कारणास्तव हे नातं थांबवावं लागतं. भारतात घटस्फोटांचं प्रमाण तेवढं जास्त नसलं तरी पाश्चात्त्य देशांमध्ये हे भरपूर प्रमाणात दिसून येतं. घटस्फोटाची अनेक कारणं असतात. काही घटनांमध्ये खरंच त्याला किंवा तिला त्रास होत असतो; तर काही प्रकरणांमध्ये घटस्फोटाची इतकी अजब कारणं ऐकायला मिळतात की, आश्चर्य वाटतं. अशाच एका महिला वकिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तिनं घटस्फोटाची किती विचित्र कारणं असतात हे सांगितलं आहे.

लग्नाला अनेक वर्षं झाल्यानंतर जोडप्यांमध्ये तक्रारी उदभवू शकतात. तसंच वकिलाच्या म्हणण्याप्रमाणे लग्नाला अथवा नात्याला अनेक वर्षं झाल्यानंतर एकमेकांना समजून घेणं अत्यंत कठीणही होऊ शकतं. अनेक वर्षांच्या सहवासानंतर काही जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम राहत नाही आणि त्यामुळे घटस्फोट होऊ शकतात. मुंबईची रहिवासी असलेली तान्या अप्पाचू कौल ही एक वकील आहे आणि ती अनेकदा सोशल मीडियावर कायद्याशी संबंधित विषयांवर माहिती देते. आताच्या व्हिडीओमध्ये तिनं घटस्फोटाची अशी कारणं सांगितली आहेत, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा

महिला वकिलानं सांगितली घटस्फोटाची अजब प्रकरणं

वकील कौल यांनी सांगितलं की, घटस्फोट घेण्यासाठी एका पतीनं कोर्टात विचित्र युक्तिवाद केला. हनिमूनच्या वेळी पत्नी अश्लील, तोकडे कपडे घालत असे. त्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे. दुसरं एक प्रकरण असं की, एका महिलेचा नवरा यूपीएससी परीक्षांची तयारी करीत असल्यामुळे त्याला पुरेसा वेळ देत नाही म्हणूनच तिला हे नातं संपवायचं आहे. तसंच बायकोनं पाया पडण्यास नकार दिला, तिला साधं जेवण कसं करायचं हे माहीत नाही. अशी घटस्फोटाची कारणंही लोकांनी सांगितली आहेत. दरम्यान, एका महिलेनं दिलेलं सर्वांत विचित्र कारण ऐकल्यानंतर संपूर्ण कोर्ट रूम हादरलं. महिलेनं तक्रार केली, की तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो. तिची खूप काळजी घेतो. अजिबात भांडत नाही. या सर्व बाबींचा तिला कंटाळा आलाय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: भयानक! घरात आलेल्या पाहुण्यांवर पाळीव सिंहाचा हल्ला; पुढे काय झालं पाहा…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. “आजकालच्या पिढीच्या अपेक्षा खूप असतात. त्यांना अॅडजेस्टमेंट करायची नसते. पर्याय खूप असतात” अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader