सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. त्यातील काही फोटो असे असतात जे खरचं मन जिंकून घेतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅरेथॉन म्हंटलं की प्रत्येकालाच जिंकण्याची जिद्द असते, त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. स्पर्धेत आपणच पहिलं यावं यासाठी सर्व खेळाडू मेहनत घेतात, अशातच खेळात स्पर्धेबरोबरच हारजीत ही आलीच. अशातच एक फोटो समोर आला आहे, या फोटोमधील तरुणीची कृती पाहून तुम्हीही म्हणाल जिंकण्यासाठी पहिलं यावं लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिंकण्यासाठी पहिलं यावं लागत नाही

केनियाची ही धावपटू जॅकलीन न्यातीपै हीचा हा फोटो आहे, व्हायरल होणारा हा फोटो २०१० चा आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता महीला धावपटू केनिया ही आपल्या दमलेल्या दिव्यांग सहकाऱ्याला पाणी पाजत आहे. मात्र, पाणी पाजल्याने या महीला धावपटूचा वेळ गेला आणि पहिला क्रमांक हुकला.परंतू ती स्पर्धा जिंकली नसली तरी जगभरातील लोकांची मनं मात्र नक्कीच जिकंली. केनियाने आपल्या कृतीतून एकप्रकारे खिलाडू वृत्तीला संजीवनीच दिली. दरम्यान आजूबाजूला उपस्थित प्रेक्षकही तिच्या माणूसकीला सलाम करीत टाळ्या वाजवत आहेत.

पाहा फोटो –

हेही वाचा – Video viral: चिमुकलीनं जिंकलं पंतप्रधानांचं मन! सुमधूर गायन, मोदींनी शेअर केला व्हिडीओ

हा फोटो वर्ल्ड ऑफ हिस्ट्री या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. आतापर्यंत या फोटोला १ लाख ३८ हजार १०० व्ह्यूज आले आहेत.  या फोटोतील महीला धावपटूमध्ये माणूसकी ओतप्रोत भरल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female athlete serving water to disabled runner photo viral srk
Show comments