Female Bear Saves Her Cub Funny Video Viral : तुम्ही प्राण्यांचे व्हिडीओत पाहिले आहेत का, जे तुम्हाला थक्क करतात? प्राण्यांचे खतरनाक व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील, पण काही प्राणी खूप मजेशीरही असतात. पाळीव कुत्रा, पक्षांचे व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करत असतात. पण आता एका जंगली अस्वलानेच लोटपोट हसण्याची संधी दिली आहे. कारण मादी अस्वलाने झाडावर अडकलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी भन्नाट शक्कल लढवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पिल्लाला वाचवण्यासाठी अस्वल काय करतं, हे पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. आईने (अस्वल) पिल्लाला झाडावरून सुरक्षीत खाली आणण्यासाठी खूप मजेशीर कृत्य केलं. अस्वलाचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून यूजर्स मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.
मादी अस्वलाचा हा व्हिडीओ @buitengebieden नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. या ट्वीटर हॅंडलवर प्राण्यांचे विनोदी व्हिडीओ नेहमीच पोस्ट केले जातात. नुकतच शेअर केलेल्या एका व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका झाडाच्या फांदीवर मादी अस्वलाचा पिल्लू चढतो. मात्र, झाडाच्या शेंड्यावर गेल्यावर त्या पिल्लाला खाली उतरण्यात अडचण निर्माण होते. हे सर्व मादी अस्वलाने पाहताच पिल्लाची आई तातडीने झाडाजवळ जाते आणि ते झाड जोरजोरात हलवण्याचा प्रयत्न करते. परंतु, झाड लवचीक असल्याने तुटतं आणि काही सेकंदातच पिल्लू जमिनीवर येतं. अस्वलाची ही भन्नाट युक्ती पाहून इंटरनेटवर एकच हशा पिकला आहे.
नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा
इथे पाहा अस्वलाचा मजेशीर व्हिडीओ
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. लोकांनी या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने म्हटलं, मी या व्हिडीओला आत्मसात का करत आहे? मला माहितेय की, अस्वल किती टेन्शनमध्ये आहे आणि मजेशीर प्रसंगाला समोरं जात आहे. एका अन्य यूजरने म्हटलं, झाडाखाली असलेलं दुसरा पिल्लू मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, हे दृष्य किती सुंदर आहे.