Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. एक तरुणी बलेट चालवताना तिची ओढणी बुलेटच्या चाकात अडल्याची घटना घडली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तरुणी बुलेट चालवताना अचानक तिची ओढणी चाकात अडकते आणि तरुणीच्या गळ्याला फास बसतो..त्यानंतर पुढे काय होतं हे तुम्हीच पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेकदा महिला, तरुणी आपली ओढणी किंवा साडीचा पदर गाडीवर बसल्यावर नीट धरत नाही. त्यामुळे याधीही असे बरेच अपघात झाले आहेत. ओढणी आणि पदर अडकल्यामुळे अक्षरश: जीवही गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच या तरुणीसोबतही असंच घडलं.

एक चूक किती महागात पडू शकते

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक दोन तरुणी रस्त्यावरुन बुलेटवर जात आहेत. यावेळी एक तरुणी बुलेट चालवत आहे तर दुसरी मागे बसली आहे. यावेळी अचानक तिची ओढणी चाकात अडकते आणि तिच्या गळ्याला फास बसतो. ती लगेच बुलेट थांबवते आणि ओढणी काढण्याचा प्रयत्न करते. यावेळी रस्त्यावरील काही लोक या तरुणीच्या मदतीला येतात. तरुणीने लगेच गाडी थांबवली म्हणून पुढच्या अनर्थ टळला अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. एक व्यक्ती तरुणीच्या गळ्यातील ओढणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर ही ओढणी निघते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की एक चूक किती महागात पडू शकते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मगरीला कोंबडी द्यायला गेलेल्या मालकालाच बनवलं शिकार; एका निर्णयामुळे तो कसा बचावला पाहाच

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. nusati_bhatkanti नावाच्या इनस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.