Female Police Slap Men Travelling In Ladies Coach : ट्रेन आणि मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी पुरुष आणि महिलांसाठी दोन वेगवेगळे डबे असतात. मात्र, मेट्रोमध्ये अनेक पुरुष महिलांच्या डब्यामधून प्रवास करताना दिसतात. विशेषत: दिल्ली मेट्रोमध्ये पहिला डबा महिलांसाठी राखीव आहे; ज्यामधून पुरुषांनी प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची शिक्षा आहे. मात्र, काही पुरुष प्रवासी दिल्ली मेट्रोच्या महिलांच्या डब्यातून सर्रासपणे प्रवास करीत असतात. अशा बेफिकीर प्रवाशांना दिल्ली पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. सध्या दिल्ली मेट्रो स्थानकावरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात महिला अधिकाऱ्यासह अनेक पोलिस मेट्रो ट्रेनच्या महिला डब्यामधून प्रवास करणाऱ्या पुरुषांना ओढून बाहेर काढत आणि त्यांना मारताना दिसत आहेत. मात्र, या घटनेनंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मेट्रोमधील लेडीज कोचमध्ये चढणे पुरुषांना पडले भारी

कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी किती कठोरता असायला हवी आणि शारीरिक हिंसाचाराचा वापर कितपत न्याय्य आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Mahatma Phule Police raided Kalyan Railway Station arrested 13 prostitutes and four gang leaders
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणारी महिलांची टोळी अटकेत
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
Shramik Mukti Sanghatna, Women property registration,
मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच, श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
morshi ST bus stand Clash between women
बसस्‍थानकावरच महिलांमध्‍ये हाणामारी…केस धरून ओढत….

बापरे! नदी ओलांडताना दगड समजून ठेवला प्राण्यावर पाय अन् पुढे जे घडलं ते फारच भयानक; पाहा video

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मेट्रो ट्रेन स्थानकावर येताना दिसत आहे. यावेळी मेट्रोच्या महिलांच्या डब्याचा दरवाजा उघडताच एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह इतर पोलीस डब्यामध्ये असलेल्या पुरुष प्रवाशांना बाहेर ओढून काढत मारायला सुरुवात करतात. अशा रीतीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकेक करून नियमभंग करणाऱ्या पुरुष प्रवाशांना महिलांच्या डब्यामधून बाहेर ओढून काढले.

हा व्हिडीओ @MANOJ SHARMA LUCKNOW UP नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांनो, जरा बघा.

लेडीज कोचमध्ये चढलेल्या पुरुषांना मारहाण, नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी दिल्ली पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली, असे म्हटले आहे. तर महिलांच्या डब्यातून पुरुषांनी प्रवास करणे महिलांसाठी गैरसोईचे आणि असुरक्षित असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर एवढी कठोर शिक्षा देऊनच पुरुषांना महिलांच्या कोचमध्ये जाण्यापासून रोखता येईल, असेही काहीजण म्हणाले.

तर दुसरीकडे काही लोक पोलिसांच्या या मारहाणीवर जोरदार टीका करीत आहेत. अनेकांनी पोलिसांची ही कारवाई अन्यायकारक आणि अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शारीरिक हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

Story img Loader