Female Police Slap Men Travelling In Ladies Coach : ट्रेन आणि मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी पुरुष आणि महिलांसाठी दोन वेगवेगळे डबे असतात. मात्र, मेट्रोमध्ये अनेक पुरुष महिलांच्या डब्यामधून प्रवास करताना दिसतात. विशेषत: दिल्ली मेट्रोमध्ये पहिला डबा महिलांसाठी राखीव आहे; ज्यामधून पुरुषांनी प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची शिक्षा आहे. मात्र, काही पुरुष प्रवासी दिल्ली मेट्रोच्या महिलांच्या डब्यातून सर्रासपणे प्रवास करीत असतात. अशा बेफिकीर प्रवाशांना दिल्ली पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. सध्या दिल्ली मेट्रो स्थानकावरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात महिला अधिकाऱ्यासह अनेक पोलिस मेट्रो ट्रेनच्या महिला डब्यामधून प्रवास करणाऱ्या पुरुषांना ओढून बाहेर काढत आणि त्यांना मारताना दिसत आहेत. मात्र, या घटनेनंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा