गुन्हगार सहसा गुन्हा केल्यानंतर त्या ठिकाणाहून पळ काढतो आणि आपण पोलिसांच्या हाती कसे लागणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त करतो. मात्र, खूप कमी लोक पोलिसांच्या हातातून सुटण्यास यशस्वी ठरतात. कारण बहुसंख्य गुन्हेगार गुन्हा करताना कोणता ना कोणता पुरावा मागे सोडतातच. काही गुन्हेगार अशा काही चुका करतात की ज्यामुळे ते स्वतःहून पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. अशीच एक महिला गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
पोलिस रेकॉर्डमध्ये फरार असलेल्या एका महिला गुन्हेगाराने पोलिस ठाण्यातच सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला. यावेळी पोलिसांना या गुन्हेगार महिलेची ओळख पटली. यानंतर त्यांनी या महिलेला मुलाखतीसाठी बोलावून अटक केली आहे. ही घटना अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे घडली आहे. या महिला गुन्हेगाराचे नाव ज्यामा जॉन्सन असे असून ४ ऑक्टोबरला पोलिसांनी तिला अटक केले आहे.
Work From Pub : ना घर, ना ऑफिस… आता थेट पबमधून करा काम! हॉटेल मालकांची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर
या महिलेने ज्या नोकरीसाठी अर्ज केला होता तो विभाग मुळातच जुन्या वॉरंटमधील फरार गुन्हेगारांना शोधण्याचे काम करतो. मोनरो काउंटी, पेनसिल्व्हेनियामधील अधिकारी जॉन्सनच्या शोधात होते. तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय जर्सी सिटीमध्ये ट्रॅफिक चार्जेसच्या १० प्रकारणांमध्येही ती फरार घोषित करण्यात आली होती.
हडसन काउंटी पोलिस स्टेशनमधील गुप्तहेराने सांगितले की, जॉनसनने सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याआधी त्याची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते. तसेच, त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही चौकशी केली जाते. जॉन्सनचे सत्य समजल्यानंतर पोलिसांनी तिला मुलाखतीसाठी बोलावले आणि तिला अटक केली. मात्र, फरार असतानादेखील तिने पोलीस स्टेशनमध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल करून धोका पत्करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पद्मिनी, बजाज, राजदूत नी अमिताभ बच्चन; हर्ष गोयंकांच्या अनोख्या तुलनेच्या प्रेमात पडले नेटकरी
पोलिस अधिकाऱ्यांना जॉन्सनकडून चोरलेली दोन क्रेडिट कार्डेही सापडली. त्यानंतर लगेचच तिच्यावर क्रेडिट कार्ड चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान जॉन्सनने इतर अनेक खुलासे केले. त्यांच्याआधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. जॉन्सनला सध्या हडसन काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.