गेल्या काही दिवसांपासून एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या लहान बाळाला घेऊन भाषण केल्यामुळे एक महिला आयएएस अधिकाऱ्यावर टीका केली जात आहे. तिला अनेक प्रश्नही विचारले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषण करणे उचित आहे का असा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे. केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिव्या अय्यर यांनी एका खाजगी चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषणही केले. मात्र त्यांची ही कृती अनेकांना आवडली नाही. यानंतर या घटनेवरून ऑनलाइन वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले.

अदूरच्या सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांपैकी एक तसेच राज्य विधानसभेचे उपसभापती चित्तायम गोपकुमार यांनी ३० ऑक्टोबरला आपल्या फेसबुक अकाउंटवर या कार्यक्राचे व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये दिव्या अय्यर आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषण करताना दिसत होत्या. यानंतर सोशल मीडियावर या घटनेसंबंधी चर्चांना उधाण आले. तथापि, वाद निर्माण झाल्यानंतर चित्तायम गोपकुमार यांनी हे व्हिडीओ डिलीट केले.

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा : विमानातून प्रवास करणं प्रवाशाला चांगलंच महागात पडलं; सुटकेसची अवस्थापाहून तुम्हालाही फुटेल घाम

या व्हिडीओमध्ये दिव्या अय्यर आपल्या मुलाला घेऊन मंचावर बसल्या होत्या. यावेळी त्या मुलासह खेळताना आणि त्याला घेऊन भाषण करताना दिसल्या. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका करण्यात आली. लोकांचे असे म्हणणे आहे की दिव्या अय्यर या एक उच्च पदस्थ अधिकारी असून असे वर्तन त्यांना शोभणारे नाही.

दिव्या अय्यर यांच्यावर जोरदार टीका होत असली, तरीही असेही अनेक लोक आहेत जे दिव्या अय्यर यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्यांनी म्हटलंय की महिला आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावत असतात आणि आपल्या मुलांबरोबर वेळ घालवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. आपल्या पत्नीवर टीका झाल्यानंतर माजी आमदार आणि युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, केएस सबरीनाधन पुढे आले आहेत. आपल्या पत्नीचा बचाव करत ते म्हणाले, हा समारंभ पूर्णपणे अनौपचारिक होता. तसेच हा त्यांच्या सुट्टीचा दिवस असल्याने त्या आपल्या मुलाला समारंभाला घेऊन गेल्या.

गुरुवारी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केएस सबरीनाधन म्हणाले, “दिव्या अय्यर या एक वचनबद्ध अधिकारी असून त्या त्यांच्या आठवड्याचे दिवस अधिकृत कामांसाठी पूर्णपणे समर्पित असतात. मात्र, सुट्टीच्या दिवशी प्रवास, बैठक आणि इतर कार्यक्रम टाळून त्या आपल्या मुलाबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. तथापि, काही कार्यक्रम टाळता येत नाहीत. अशा परिस्थितीत त्या आपल्या मुलासह संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची कल्पना आधीच आयोजकांना देऊन ठेवतात.”

हेही वाचा : कारला टेकून उभा राहिल्याने सहा वर्षाच्या मुलाच्या पेकटात घातली लाथ, नेटकऱ्यांचा संताप; Video Viral

इतर अनेकांनी दिव्या यांना पाठिंबा दर्शविला आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांचे उदाहरण दिले. जॅसिंडा आर्डर्न यांनी २०११८ मध्ये त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आणून इतिहास घडवला होता. यूएन शांतता परिषदेत भाषण देताना आर्डर्न यांनी आपापल्या मुलीला कडेवर घेतले होते. ही घटना संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली होती.