विमानाने प्रवास करायचा प्लान ठरला तर पहिला प्रश्न असतो तो म्हणजे दारू… विमानातून प्रवास करताना लाऊंजमध्ये जाऊन पेगवर पेग रिचवण्याचं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. पण विमानात बसल्यानंतर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या दारूमध्ये सुद्धा मर्यादा आल्यामुळे अनेकांना घोट घोट दारू पिऊनच हा आनंद घेता येत असतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका महिलेने चक्क दारूच्या बाटल्या घेऊन आली होती. विमानतळावर चेक इन करताना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला दारू विमानात नेण्यासाठी मनाई केली. त्यानंतर या महिलांनी थेट विमानतळावरच दारू पार्टी सुरू केली. इतकंच नव्हे तर महिलांनी या दारू पार्टीत इतर प्रवाशांनाही सामील करत त्यांना सुद्धा वोडका शॉट वाटले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडियावर ही अनोखी दारू पार्टी चर्चेत आलीय.

जगात दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण आज आम्ही तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने दारूच्या शौकिनांची ओळख करून देणार आहोत. अशाच दारूच्या शौकीन महिलांचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ TikTok युजर @latinnbella ने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठीच्या रांगेत उभ्या राहून आधी स्वतः दारूचे एक एक घोट घेताना दिसून येत आहे. नंतर रांगेत असलेल्या इतर प्रवाशांना सुद्धा या महिला दारूचे वाटप करताना दिसत आहेत.

काय आहे या अनोख्या ‘दारू पार्टी’मागची कहाणी?

या महिला विमानतळावर सोबत आणलेल्या अल्कोहोलची चाचणी करून घेण्यास विसरल्या होत्या. विमानतळावरील नियमानुसार, कोणताही प्रवासी १०० मिली पेक्षा जास्त अल्कोहोल सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणूनच या महिलांना चेक इन पॉइंटवर थांबवण्यात आलं. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेने सांगितलं की, “त्यांनी आम्हाला चेक इन करताना आमच्या दारूच्या बाटल्या घेऊन जाऊ दिल्या नाहीत, म्हणून आम्ही रांगेत उभ्या असलेल्या सर्वांना मोफत वोडका शॉट्स वाटून दिले.”

आणखी वाचा : मोठ्या स्टाईलमध्ये बाईक स्टार्ट करू लागली… मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही ! पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीबाईचा अनोखा स्वॅग, तोंडात ५०० रूपयाची नोट धरून केला बेफाम डान्स

हे दृश्य पाहून विमानतळ सुरक्षारक्षकांना सुद्धा हसू आवरले नाही

या व्हिडीओमध्ये, एक महिला मालिबू अननस रमचा एक घोट घेताना दिसतेय. त्यानंतर ती बाटली दुसऱ्या महिलेकडे देते. दुसरी महिला देखील सर्क वोडकाची बाटली पूर्ण संपवण्यासाठी मदत करते. या व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, विमानतळ सुरक्षा कर्मचारी एकमेकांना दारूचे वाटप करताना पाहून हसताना दिसत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ८० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. काही लोक खूप प्रभावित झाले, तर दुसरीकडे काही लोक या प्रकारामुळे निराश झाले. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “मला विश्वास बसत नाही की विमानतळावर अशा प्रकारच्या वर्तनाला परवानगी देण्यात आली.”

Story img Loader