Woman Crazy Dance In Hospital : शाहरुख खान स्टारर जवान चित्रपटाने गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी शाहरुखचे पोस्टर्स आणि बॅनर्स झळकत आहेत. जवान चित्रपटाशी संबंधित व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटाने जगभरातून ६०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केलीय. चित्रपटाचं चलेया आणि जिंदा बंदा गाण्याची लोकांना भुरळ पडली आहे. अशातच शाहरुखच्या खानच्या जबरा फॅनचा व्हिडीओ समोर आला आहे. शाहरुखचं गाणं सुरु होताच एक महिला रुग्ण बेडवरुन उठली आणि चक्क डान्स करु लागली. महिलेचा हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

एका महिला रुग्णाचा सलाईन लावलेली असताना चलेया गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, महिला रुग्ण शाहरुख खानचं गाणं सुरु होताच भन्नाट डान्स करते. रुग्णालयात सलाईन लावलेली असतानाही या तरुणीला शाहरुखच्या गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. तरुणीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, शाहरुख खानकडे रुग्णांना बरं करण्याची शक्ती आहे. एसआरकेनं मला रुग्णालयात स्वस्थ ठेवलं. व्हिडीओ व्हायरल होताच आतापर्यंत या व्हिडीओला ९० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
rahul vaidya says virat kohli blocked him on instagram
Video: “विराट कोहलीने मला ब्लॉक केलंय”, प्रसिद्ध मराठमोळ्या गायकाचा दावा; म्हणाला…
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा तरुणीच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ

तरुणीच्या या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सने मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, नर्स बोलली असेल की, मी तर इंजेक्शन द्यायला आली होती. दुसऱ्या यूजरने म्हटलं, लवकर बरी हो, तुला या गाण्यावर डान्स करताना पाहून मला खूप चांगलं वाटत आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलं, डान्स लवकर संपव..इंजेक्शनही मारायचा आहे.

Story img Loader