Viral video: घरातील जबाबदाऱ्या, मुलं आणि आपलं काम सांभाळणं ही स्त्रियांसाठी सोपी गोष्ट नाही. कोणी नोकरी करते तर कोणी व्यवसाय, पण ऑफिस आणि घर सांभाळताना प्रत्येक बाईची तारांबळ उडतेच. वेळ कुठे कसा निघून जातो ते कळत नाही. अनेकवेळा इतकी कामे सगळ्या बाजूने धावून येतात की कुठले काम आधी करावे ते कळत नाही. येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करत ती या दोन्ही गोष्टी सांभाळत आहे. पण कधी मुलं आणि घर तर कधी ऑफिसच्या डेडलाईन हे सारं करताना ती दमून जाते. घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळणाऱ्या महिलांची चांगलीत कसरत असते. त्यामुळे ऑफिसला जरी जात असल्या तरी घरातल्या जबाबदाऱ्या या स्त्रीयांना पार पाडाव्याच लागतात. शेवटी स्त्रिया चंद्रावर गेल्या तरी घर सुटत नाही हेच खंर.. सध्या याचंच उदाहरण दाखवणारा एका महिला पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला पोलीस मुंबई लोकलमध्ये भाजी निवडताना दिसत आहे. नोकरी करताना कामाचा व्याप, भविष्याची चिंता, घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण येतो. बऱ्याचदा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. त्याच त्या रूटीनचा कंटाळा येतो. अशा मनःस्थितीत कामातही लक्ष लागत नाही व सुट्टीही हवी तशी घालवता येत नाही. यामुळे ताण कमी व्हायच्या ऐवजी वाढतो. त्यासाठीच काम आणि घर यात समतोल साधला गेला पाहिजे.
आपण पोलिसांच्या सिंघम स्टाईलचे व्हिडीओ, डान्सचे व्हिडीओ किंवा एखाद्याला जीवनदान देतानाचे अनेक व्हिडीओ एवढच नाही तर भर ऊन्हात, पावसात, आंदोलनात, आपले घर-कुटुंब सोडून जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यांवर दिवस-रात्र उभे राहिलेले व्हिडीओसुद्धा आपण पाहिले आहे. तेव्हा खरोखरच आपल्या मनातील त्यांचा आदर हा वाढतो. मात्र यांनाही घरदार असतं हे आपण बऱ्यादा विसरतो. कर्तव्याबरोबरच जबाबदाऱ्याही पार पाडणं हे स्त्रियांनाच जमू शकतं.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ bhagyashrigosavi14 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जॉबवर असतांना सुद्धा काम एका जबाबदारीतुन सुटलं की लगेच घरची जबाबदारीची ड्युटी चालु होते.” तर आणखी एकानं, “अप्रतिम व्हिडिओ तरी सुद्धा नोकरीची जबाबदारी पार पाडताना सुद्धा कित्येक त्रास देत असणारच. हे चित्र नव्हे तर खरी खुरी हकीकत आहे.”