Spider play dead while sex: सेक्स या विषयावर अनेक जण बोलायला टाळाटाळ करत असले तरी, हा माणसांप्रमाणे प्राण्याच्या जिवनाचाही अविभाज्य घटक आहे. माणसांप्रमाणे प्राणी, पक्षी आणि किटकांचंही एक वेगळं जग असतं. ज्याप्रमाणे माणसाने जगण्यासाठी काही नियम आखले आहेत तसेच प्राण्यांचेही नियम आहेत. कोळ्यांच्या काही प्रजातींमध्ये सेक्सनंतर मादी नराची शिकार करते. यामुळे नर कोळी आपलं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात.

नर कोळी आपले आकर्षक रंग दाखवून मादीला आकर्षित करतात

नर कोळी आकाराने मादीपेक्षा लहान असतो. पूर्ण वाढलेला नर आपले शुक्राणू पादमृशाच्या शेवटच्या खंडावरील फुगवट्यातील नागमोडी नलिकेत साठवून ठेवतात. काही आपले आकर्षक रंग दाखवून मादीला आकर्षित करतात. इतर काही मादीला आपण केलेली शिकार देऊन खूष करतात. प्रौढ नराच्या पादमृशाच्या शेवटच्या खंडावर त्याच्या प्रजनन संस्थेशी संबंधित एक इंद्रियप्रवेशी अंग असते. अत्यंत सावधपणे तिच्याजवळ जाऊन नर आपल्या पादमृशावरील खंडात साठवून ठेवलेले शुक्राणू तिच्या जननेंद्रियात सोडून तात्काळ दूर जातात.

How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
sexual health to sleep
लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Marathi actor subodh bhave talks about marriage
“लग्नसंस्थेत मुलीच्या त्यागाची गोष्ट मोठी, मुलांना…”, सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “लग्न ही कायमच ज्वलंत समस्या…”
Gisele Pelicot
पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
Pune woman slaps a drunk man in bus for touching her badly molesting bus video viral on social media
“कुठेही हात लावशील का?”, पुण्यात महिलेने दारुड्याला घडवली जन्माची अद्दल; ‘त्या’ बसमध्ये नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

मादी कोळी शरिरसंबंध ठेवताना मेल्याचं नाटक करतात

पण मादी कोळी या जास्त स्मार्ट असतात. असं सांगतात की, मादी कोळी या शरिरसंबंध ठेवताना मेल्याचं नाटक करतात. एका अभ्यासानुसार, फनल कोळी सेक्स करताना अजब पद्धतीने वागतात. सेक्स करताना त्या आपण मेलो आहोत असं नाटक करतात. जेणेकरुन नर कोळ्याला आपल्याला मादी कोळीपासून काहीच धोका नाही असं वाटतं. कारण सेक्सनंतर मादी कोळी लगेच नर कोळीला खाऊन टाकते. त्यातच काही प्रजाती अजब पद्धतीने वागत आहेत. याला सेक्सुअल कैटालेप्सीअसं म्हटलं जातं. यामध्ये मादी आपले पाय वाकवते आणि स्थिर अवस्थेत राहते. यामुळे ती मेली आहे असं वाटतं. यामुळे नराला आता आपल्यावर हल्ला होणार याची चिंता राहत नाही आणि ते सेक्स करतात.

हेही वाचा – Viral Video: चिखलात लपून बसलेल्या मगरीचा भयानक हल्ला; पण ‘त्या’ एका चुकीमुळे फसला खेळ

हा अभ्यास करंट जूलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 

Story img Loader