सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील बनवली आहेत. याच गाण्यावर एका महिला शिक्षिकेने रील बनवलं आहे. जे सध्या व्हायरल होत आहे.
फिजिक्सच्या मॅडमनी केला डान्स –
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गुलाबी शरारा या गाण्यावर एक शिक्षिका काही विद्यार्थिनींबरोबर डान्स करताना दिसत आहेत. या डान्सचा व्हिडीओ kajalasudanii नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, शाळेच्या आवारात हिरव्या रंगाची साडी घातलेली एक शिक्षिका दिसत आहेत, ज्या खूप सुंदर असा डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या मॅडम फिजिक्सच्या शिक्षिका असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांच्या पाठीमागे काही मुलीही डान्स करत आहेत. या शिक्षिकेच्या डान्स स्टेप्स अप्रतिम असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
गुलाबी शरारा गाण्यावर डान्स करणाऱ्या या शिक्षकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत १२ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ४ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. तसेच नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “मॅडम, तुम्ही अप्रतिम आहात.” तर दुसऱ्याने लिहिलं, “फिजिक्स शिकवणारे शिक्षक असे असतील तर फिजिक्सचा अभ्यास करायला मजा येईल.” आणखी एका युजरने लिहिलं, “हा खूप सुंदर व्हिडीओ आहे.” तर अनेकजण या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत असून काहींनी शिक्षकेच्या डान्स स्टेप्सचे कौतुक केलं आहे.