सध्याच्या डिजिटल युगात लोकांना आपलं मन रमवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करावा लागतो. शिवाय या अॅप्सच्या वापरामुळे अनेक जण आभासी जगात पूर्णपणे हरवून जातात. त्यांना वास्तवाचं भान देखील रहात नाही. सोशल मीडिया ही मनोरंजनाचे एक चांगले माध्यम आहे. मात्र, त्याचा अतिरेक झाल्यास लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याचेच एक उदाहरण समोर आलं आहे.

इंग्लंडमधील एका महिलेने दररोज १४ तास सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे आता तिला आता चालायला येणं देखील कठीण झालं आहे. याबाबत डेली स्टार न्यूज वेबसाइटने माहिती दिली आहे. डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधील वॉर्सेस्टरमधील फेनेला फॉक्स या २९ वर्षीय महिलेने सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे तिला व्हिलचेअरशिवाय चालता देखील येत नाहीये.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
indian railway viral video
ट्रेनमधून प्रवास करताना ‘ही’ एक चुक पडू शकते महागात, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO 
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
train accident man saved a life of another man who was standing on a railway track Viral video
बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

आणखी वाचा- गाण्यातून बाराखडी शिकवणाऱ्या या शिक्षकाच्या प्रयत्नांनी जिंकली नेटकऱ्यांची मनं; Viral Video पाहून तुम्हीही घ्याल यात सहभाग

फेनेला फॉक्स ही एका बेवसाईटवर प्रौढ कंटेंट क्रिएट करण्याचं काम करते. या कामाद्वारे तिने बक्कळ पैसा देखील कमावला आहे. या कामाद्वारे तिने जवळपास ९ कोटी रुपये कमावले आहेत. शिवाय जगातील टॉप १ टक्के कंटेंट क्रिएटर्सच्या यादीमध्ये देखील तिचा समावेश झाला आहे. मात्र, फेनेलाने पैसा कमावण्याच्या नादात आपलं आयुष्य धोक्यात घातलं आहे.

कोरोना काळातील लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच तिने सोशल मीडियाचा वापर वाढवला होता. ती दिवसातील जवळपास १४ तास फोनवर असायची. त्यामुळे तिला वर्टिगा या आजाराचा त्रास होऊ लागला. या आजारात लोकांना चक्कर येणं, डोकेदुखी, ताप येणं आणि डोळे कमजोर होण्याचा त्रास जाणवतो. याच आजाराने ग्रस्त झालेल्या फेनेलाला हृदयविकाराचा त्रासही होऊ लागला.

आणखी वाचा- Video: सिंहिणीसह सेल्फी काढत होती तरुणी, अस्वलाने मागून येऊन टीशर्ट खेचलं अन चार चौघात..

या सर्व कारणांमुळे तिला अनेक महिने नीट चालता देखील येत नव्हते डॉक्टरांनी तर कोणतही काम करण्यास मनाई करत केवळ आराम करायला सांगितला होतं. शिवाय या सर्व त्रासामुळे एक वेळ अशी आली होती की आता मी मरणार असं वाटलं, असं देखील फेनेलाने डेली स्टारशी बोलताना म्हणाली.
दरम्यान, सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करणे, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे हेही खूप अवघड असतं आणि त्यासाठी खूप वेळ लागायचा अंसंही तीने सांगितलं. शिवाय फेनेलाला वर्टिगोचा एवढा त्रास जाणवू लागला की चालण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करावा लागतोय. शिवाय १० तासांपेक्षा अधिकचा वेळ जर तिने सोशल मीडियावर घालवला तर पुन्हा शरिराचे दु:खणे सुरु होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती वेळ घालवताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे हेच या घटनेतून समोर आलं आहे.