हिवाळ्यामध्ये हवा प्रचंड गार असते. अगदी घरी असतानादेखील आपण अंगावर स्वेटर किंवा उबदार कपडे घालून बसलेलो असतो. अशा दिवसांमध्ये जर तुम्हाला बसमधून म्हणा किंवा रेल्वेमधून प्रवास करायची वेळ आली तर थंडीने जीव हैराण होतो. सध्या उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याचे आपल्याला बातम्यांमधून समजते. अशात तुम्ही रस्त्यावर जागोजागी शेकोटी लावून त्याच्या अवतीभोवती माणसं गोळा होऊन आपले हात शेकून शरीराला उब देत असतानाचे दृश्य पहिलेच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, तुम्ही कधी चालू रेल्वेमध्ये शेकोटी लावल्याचे पहिले आहे का? अशी एक घटना नुकतीच मेरठ ते प्रयागराजला जाणाऱ्या संगम एक्स्प्रेसमध्ये घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे. या व्हिडीओनुसार, हा प्रकार १७ जानेवारी रोजी घडल्याचे @burt.india ने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून समजते.

हेही वाचा : बापरे! बिबट्याने हॉटेलमध्ये घातला धुमाकूळ; व्हायरल होणारा चित्तथरारक व्हिडीओ पाहा…

ट्रेनमध्ये शेकोटी पेटवतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

जेव्हा गाडी कानपूर सेंट्रल या रेल्वेस्थानकावर थांबली, तेव्हा रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणाबद्दल चौकशी केली. तेव्हा, एसी बोगीमध्ये बसलेल्या भारतीय किसान युनियनच्या काही मंडळींनी थंडीपासून रक्षण होण्यासाठी आणि थोडी उब मिळावी यासाठी चालू गाडीत लहानशी शेकोटी पेटवली होती, अशी माहिती त्यांना मिळाली. यावर वरिष्ठ सरकारी रेल्वे पोलिस अधिकारी संजीव कुमार यांनी असे करणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे शेकोटी पेटवणाऱ्यांना सांगितले. या सर्व प्रकारानंतर गाडी पुन्हा प्रयागराजच्या दिशेने सोडण्यात आली असल्याची माहिती शेअर झालेल्या व्हिडीओमधून समजते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून, लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या पाहूया.

“त्यांना बिना एसीचा डबादेखील बुक करता येऊ शकत होता हे माहीत होतं ना?” असे एकाने विचारले. दुसऱ्याने “अशा लोकांना सुविधा पुरवण्याआधी, शिक्षण देण्याची गरज आहे”, असे सांगितले आहे. तिसऱ्याने, “हातांना उब देण्यासाठी? अरे देवा!” असे लिहिले आहे. चौथ्याने “भारतात आपले स्वागत आहे”, असे म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “कृपया त्यांना जेलमध्ये पाठवू नका, त्यांना कोणतीही शिक्षा करू नका, पण कृपा करून त्या सर्वांना शाळेत पाठवा आणि थोडी ज्ञानात भर घाला. किमान साध्या गोष्टी तरी शिकवा”, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा : “गं तुझं टप्पोरं डोलं…” गाणं म्हणणाऱ्या चिमुकलीनं नेटकऱ्यांना लावलं वेड! व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा…

या व्हिडीओला आतापर्यंत २.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Few people started bonfire in moving railway going from meerut to prayagraj sangam express video went viral dha
Show comments