Japanese man celebrates 6th wedding anniversary with cartoon wife : आपण सगळेच लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स बघत मोठे झालो. त्यामुळे काळ बदलला, पिढ्या बदलल्या, लहान मंडळीही मोठी झाली, मोठी माणसं वयोवृद्ध झाली; पण त्यांचे कार्टून्सवरील प्रेम काही कमी झालेले नाही. आजही तुम्ही कुणाला विचारलं, तर त्यांना कार्टून्समधील अनेक पात्रे आठवत असतील. काहींना तर कार्टून्सचे इतके वेड असते की, ते वयाने मोठे झाल्यानंतरही ते कार्टून पाहिल्याशिवाय एकही दिवस राहू शकत नाहीत. सतत कार्टून्स पाहिल्याने त्यांना अनेक कार्टून्सपैकी एक तरी कार्टून इतके आवडीचे होते की, ते जणू त्याच्या प्रेमात पडतात. अनेकदा आवडत्या कार्टून्सचे फोटो, स्टिकर्स, लॉकेट्स खरेदी करतात. त्यांचे हे कार्टून्स प्रेम आपण समजून शकतो; पण जपानमधील एका व्यक्तीने लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने चक्क आवडत्या कार्टून कॅरेक्टरशी लग्नगाठ बांधली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने नुकताच लग्नाचा सहावा वाढदिवसदेखील साजरा केला. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याच्या अनोख्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याच्या या अजब प्रेमाची गजब कहाणी आपण जाणून घेऊ…

सोशल मीडियावर अनोख्या प्रेमकहाणीचे फोटो व्हायरल

m

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

m

E

जपानमधील ४१ वर्षीय अकिहिको कोंडो आणि त्याची पत्नी म्हणजे एक कार्टून कॅरेक्टर यांची ही अजब प्रेमकहाणी आहे. जपानी अकिहिकोने व्हर्च्युल गायक हातसुने मिकूबरोबर ४ नोव्हेंबर रोजी सहा वर्षांपूर्वी लग्न केले. नुकताच त्याने लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला, त्याच्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणाचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले; जे आता खूप व्हायरल होत आहेत.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, अकिहिको कोंडो २००७ मध्ये प्रदर्शित झालेले मिकूचे पात्र असलेल्या कार्टूनच्या प्रेमात पडला. अकिहिको कोंडोला कार्टून पाहण्याची प्रचंड आवड होती, त्याला स्वत:च्या आवडीच्या मुलीशी लग्न करायचे होते. पण, त्याचे कार्टूनप्रति असलेले वेड पाहून अनेक जण त्याची थट्टा-मस्करी करायचे, त्याला चिडवायचे. हे कार्टून वेड पाहून लग्नासाठी त्याला सात मुलींनी नकार दिल्याचे तो सांगतो.

“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…

कार्टूनवरील त्याचे प्रेम पाहून नातेवाईक, मित्रमंडळी आणि त्याचे आजूबाजूचे लोक त्याला वेडा म्हणायचे. यावेळी समाजातून मिळणाऱ्या अशा वागणुकीमुळे त्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यातून त्याला मानसिक आजाराने घेरले. मग आजारातून बरे होण्यासाठी त्याने हिलिंग थेरपी घेतली; ज्यात त्याला या कार्टून्स कॅरेक्टरशी सतत बोलण्याची सवय लागली. मिकूबरोबर बोलताना तिच्या आवाजामुळे तो या मानसिक आजारातून बाहेर येऊ शकला, असे अकिहिको कोंडो याने सांगितले.

सात मुलींचा नकार पचवून अखेर कार्टून कॅरेक्टरशी केलं लग्न

n

या घटनेनंतर २०१८ साली टोकियोमध्ये त्याने आपले आवडते कार्टून कॅरेक्टर हातसुने मिकूसह लग्न केले. हातसुने मिकू एक गायक व्हॉइस सिंथेसायझर सॉफ्टवेअर आहे. अकिहिकोने होमोग्राम उपकरणाच्या मदतीने मिकूला प्रपोज केले. यावेळी तिने त्याचा आवाज ऐकून लग्नासाठी होकार कळवला. सध्या सोशल मीडियावर अकिहिको कोंडो आणि कार्टून कॅरेक्टर मिकू यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगतेय. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात अकिहिको कोंडो पोज देत मिकूच्या बाजूला बसला आहे. तसेच फोटोतील एका ‘केकवर मिकू तू मला खूप आवडतेस’, असे जपानी भाषेत लिहिलेले आहे.

Story img Loader