Japanese man celebrates 6th wedding anniversary with cartoon wife : आपण सगळेच लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स बघत मोठे झालो. त्यामुळे काळ बदलला, पिढ्या बदलल्या, लहान मंडळीही मोठी झाली, मोठी माणसं वयोवृद्ध झाली; पण त्यांचे कार्टून्सवरील प्रेम काही कमी झालेले नाही. आजही तुम्ही कुणाला विचारलं, तर त्यांना कार्टून्समधील अनेक पात्रे आठवत असतील. काहींना तर कार्टून्सचे इतके वेड असते की, ते वयाने मोठे झाल्यानंतरही ते कार्टून पाहिल्याशिवाय एकही दिवस राहू शकत नाहीत. सतत कार्टून्स पाहिल्याने त्यांना अनेक कार्टून्सपैकी एक तरी कार्टून इतके आवडीचे होते की, ते जणू त्याच्या प्रेमात पडतात. अनेकदा आवडत्या कार्टून्सचे फोटो, स्टिकर्स, लॉकेट्स खरेदी करतात. त्यांचे हे कार्टून्स प्रेम आपण समजून शकतो; पण जपानमधील एका व्यक्तीने लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने चक्क आवडत्या कार्टून कॅरेक्टरशी लग्नगाठ बांधली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने नुकताच लग्नाचा सहावा वाढदिवसदेखील साजरा केला. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याच्या अनोख्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याच्या या अजब प्रेमाची गजब कहाणी आपण जाणून घेऊ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा