फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने अत्यंत रोमहर्षक पद्धतीने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर जगभरामध्ये अर्जेंटिना संघाच्या चाहत्यांबरोबरच लिओनेल मेसीच्या चाहत्यांनीही जल्लोष साजरा केला. मात्र कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यातील जल्लोष साजरा करताना एका अर्जेंटिनीयन महिला चाहतीने चक्क अंगावरील टॉप काढून आनंद साजरा केला. मात्र अशाप्रकार अर्धनग्न होऊन सेलिब्रेशन करणं या चाहतीला महागात पडण्याची शक्यात आहे. कॅमेरासमोरच टॉप काढण्याच्या या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या चाहतीवर कठोर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
झालं असं की अर्जेंटिनाच्या गोन्झालो मोन्टिएलने विजयी पेनल्टी शॉट मारल्यानंतर मैदानात उपस्थित असणाऱ्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ३६ वर्षांचा विश्वचषक जिंकण्याचा दुष्काळ मेसीच्या नेतृत्वाखालील संघाने संपल्यानंतर बेभान झालेल्या एका महिलेने अंगावरील टॉप काढून हवेत फिरवला. कॅमेरामन चाहते कशाप्रकारे जल्लोष करत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच कॅमेरात या महिलेचं हे विचित्र सेलिब्रेशन कैद झालं. या व्हिडीओत महिला अर्जेंटिनाच्या मोठ्या राष्ट्रध्वजाच्या मागे उभी राहून जल्लोष करताना टॉपलेस झालेली दिसत आहे.
मात्र आता या प्रकरणामध्ये ही महिला अडचणीत येण्याची शक्यता आहे. कतारमधील विश्वचषकाच्या आधीच चाहत्यांनी येथील नियम आणि संस्कृतीला अनुसरुन वागणूक करावी असं आयोजकांनी सांगितलं होतं. कतारमधील पर्यटन विभागाने सर्व महिला आणि पुरुष चाहत्यांनी ढोपर आणि गुडघे झाकले जातील असा पोषाख करावा असं आवाहन केलं होतं. कतारमध्ये महिलांना तंग कपडे घालण्यास बंदी आहे. तसेच छातीचा भाग दिसेल अशापद्धतीचे टॉप किंवा कपडे महिलांना परिधान करण्यावरही निर्बंध आहेत.
नक्की वाचा >> Argentina Wins World Cup: मेस्सीचा खेळ पाहून पंतप्रधान मोदीही झाले प्रभावित; म्हणाले, “हा सामना फुटबॉलच्या इतिहासातील…”
आता या महिलेला कतारमधील नियमांप्रमाणे तुरुगंवास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुरुंगवास नाही झाला तरी या महिलेकडून मोठा आर्थिक दंड आकारला जाईल असं म्हटलं जात आहे.