FIFA World Cup: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. ६० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या अल बायत स्टेडियममध्ये इक्वेडोर विरुद्ध यजमान कतार असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये इक्वेडोरने २-० असा विजय मिळवला. 2022 विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात अर्जेंटिनाच्या महिला पत्रकारासह एक विचित्र किस्सा घडला आहे. द मिररच्या माहितीनुसार लाईव्ह टीव्हीवर रिपोर्टींग करताना या महिलेच्या हॅन्डबॅगमधील काही वस्तू चोरीला गेल्याचे समजत आहे. अर्जेंटिनाची पत्रकार डॉमिनिक मेट्झगर हिच्या हॅन्डबॅगमधील वस्तू घेऊन काही चोरांनी पळ काढला. मुळात लाईव्ह प्रक्षेपणात अशी चोरी होणे हीच बाब जरा विचित्र आहे मात्र या प्रकरणाची तक्रार करतानाच या महिलेला पोलिसांनी जे उत्तर दिले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल .

फिफा वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात कतारचा सामना इक्वेडोरशी होणार होता. सुरुवातीच्या सामन्याच्या तयारीत, अर्जेंटिनाची पत्रकार डॉमिनिक मेट्झगर थेट प्रक्षेपण करत असताना तिच्या हँडबॅगमधील वस्तू चोरीला गेल्याचे समजले. हा प्रकार लक्षात येताच महिला पत्रकाराने थेट पोलिस स्टेशन गाठले, यावेळी तिने झाल्या प्रकारची माहिती पोलिसांना देताच एका महिला पोलिसानेच तिला एक उलट प्रश्न करायला सुरुवात केली.

हे ही वाचा<< १४ जणांच्या जेवणाचं बिल १ कोटी ३६ लाख! सॉल्ट बेने शेअर केला बिलाचा फोटो; बघा ‘यांनी’ खाल्लं तरी काय?

पत्रकार डॉमिनिकच्या माहितीनुसार पोलिसांनी विचारले की, “आमच्याकडे सर्वत्र हायटेक कॅमेरे आहेत. आम्ही त्या चोराला शोधणार आहोत. तो सापडल्यावर न्याय व्यवस्थेने काय करावे असे तुम्हाला वाटते? तुम्हाला कोणता न्याय हवा आहे? आम्ही त्याला कोणती शिक्षा द्यावी अशी तुमची इच्छा आहे? त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते का? त्याला हद्दपार करायचे आहे का?”

हे ही वाचा<< Video: सूर्यकुमार यादवने दिली १३ खाजगी प्रश्नांची उत्तरं; बायकोच्या ‘त्या’ गुगलीवर ‘Sky’ झाला क्लीन बोल्ड

दरम्यान या प्रश्नांनी गोंधळून पत्रकार डॉमिनिक यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आहे.