Crow and snake fight shocking video: आपण सर्वांनी साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईबद्दल ऐकले आहे. तर, अनेक वेळा तुम्ही त्यांना समोरासमोर लढताना पाहिलेही असेल. पण, तुम्ही कधी कावळा आणि साप यांना एकमेकांशी लढताना पाहिले आहे का? असे दृश्य क्वचितच कोणी याआधी पाहिले असेल. पण आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक धक्कादायक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये कावळा आणि साप एकमेकांशी अशा प्रकारे लढताना दिसत आहेत की, ते जणू एकमेकांचे शत्रू आहेत. या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, दोघेही एकमेकांवर जोरदार हल्ला करीत आहेत आणि कोणीही मागे हटण्यास तयार नाही, जे पाहून लोक आश्चर्यचकित झालेत.
सापाला बहुतांशी सगळेच घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळतात. मात्र, मुंगूस हा असा एक प्राणी आहे की, तो सापाला खेळवून खेळवून ठार करतो. त्यामुळे साप नेहमीच मुंगुसाला घाबरतो. पण, या व्हिडीओत सापाला हरवणारा आणखी बलाढ्य कुणीतरी असल्याचे दिसत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं…?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक साप कावळ्याच्या घरट्याकडे जात होता, जिथे त्याची पिल्ले होती. कावळ्याने सापाला पाहताच लगेच त्याच्यावर हल्ला केला. कावळा आपल्या चोचीने सापावर वारंवार हल्ला करतो; तर साप त्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी फुत्कार टाकतो आणि प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
ही लढाई सुमारे एक तास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कावळा आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी कोणती भीती न बाळगता, स्वत:चा जीव धोक्यात घालून, सापावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तो भक्ष्य मिळविण्याच्या जिद्दीने इरेस पेटलेला साप हार मानण्यास तयार नाही आणि आपला फणा वर करून प्रतिहल्ला करीत राहतो. पण, कावळ्याने पिल्लांच्या रक्षणासाठी दाखविलेले असीम धाडस आणि त्याचे सततचे हल्ले यांच्या पुढे तो जास्त काळ तग धरू शकत नाही. शेवटी कावळा जिंकतो आणि साप मारला जातो. अखेर या लढाईत कावळ्याने आपल्या पिल्लांचे प्राण वाचवले. हे धाडस पाहून लोक कावळ्याचे कौतुक करीत आहेत.
कावळा आणि सापाच्या लढाईने नेटकरी अवाक
व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला नैसर्गिक योद्ध्यांमधील लढाई म्हणत आहेत. तर, काहींना आश्चर्य वाटते की, कावळादेखील इतके धाडस दाखवू शकतो. सहसा सापाचा सर्वांत मोठा शत्रू मुंगूस किंवा गरुड मानला जातो; परंतु या व्हिडीओमधून हे दिसून आले आहे, की गरज पडल्यास कावळा सर्वांत धोकादायक प्राण्यालाही तोंड देऊ शकतो. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @viral36garh नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरीही यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.