साप मोठा असो वा छोटा सगळेच त्यांना घाबरतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ साप आणि कोंबडी यांच्यातील लढतीचा आहे, ज्यामध्ये कोण जिंकतं, हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच कळेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, एक कोंबडी धोकादायक सापापासून स्वतःला वाचवण्याचे धाडस कसे दाखवते ते तुम्हाला दिसेल.
नक्की काय झालं?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोंबडी आपल्या अंड्यांवर बसली आहे, तेव्हाच एक काळा साप तिच्या जवळ जातो. कोब्रा कोंबडीसमोर बसतो. फणा पसरवून बसलेला कोब्रा कोंबडीवर हल्ला करतो, त्यानंतर कोंबडीही चोचीने हल्ला करू लागते. कोंबडी हार मानत नाही आणि कोब्रा निघून जाईपर्यंत चोच मारत राहते.
(हे ही वाचा: लग्नात वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि…; पहा Viral Video)
(हे ही वाचा: विकेट घेताच ड्वेन ब्रावोने ‘पुष्पा’ स्टाईलने केला डान्स, सेलिब्रेशनचा Video Viral)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कोंबडीचे कौतुक करत आहेत आणि कोंबडीने पिल्लांचे रक्षण केल्याबद्दल कौतुक करत आहेत. हे पाहून काही लोकांना आश्चर्य वाटले असले तरी ती कोंबडी विषारी सापासमोर लढत राहिली जोपर्यंत साप निघून जात नाही. एका यूजरने म्हटले की, ‘आम्ही कल्पनाही केली नव्हती, साप आणि कोंबडीमध्ये भांडण होऊ शकते.’ तर तुम्ही पाहिले की आई आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी कोणालाही घाबरत नाही.