Fight During River Rafting :रिव्हर राफ्टिंगचे नाव ऐकले की आपल्या मनात पाण्याच्या लाटांचे आवाज घुमू लागतात. उन्हाळ्यात, लोकांना वॉटर अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करायला आवडतात, ज्यामध्ये रिव्हर राफ्टिंगचे नाव सर्वात वर येते. रिव्हर राफ्टिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. मात्र, पाण्यात बुडी मारणे जेवढे चांगले वाटते, तेवढीच या काळात खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान असाच एक रिव्हर राफ्टींग दरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
ऋषिकेश, उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे गंगा नदीत राफ्टिंग करताना वेगवेगळ्या राफ्टमध्ये बसलेल्या दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की राफ्टिंग करताना काही लोक एकमेकांना राफ्टिंग पॅडल मारताना दिसले. त्यानंतर एका व्यक्तीने नदीत उडी मारली. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वादाचं खरं मूळ गो प्रो कॅमेरा आहे. या कॅमेर्याने पर्यटक गंगेच्या लाटा आणि त्यातील अॅडव्हेंचर शूट करतात. त्याबदल्यात गाईड पर्यटकांकडून मनमानी पैसे घेतात. या भांडणाचं कारणही तोच गो प्रो कॅमेरा असल्याचं बोललं जात आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – अबब ! कोल्हापुरात वादळाने उडून गेला हत्ती, Video पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
मुनी की रेती पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर रितेश शाह यांनी सांगितले की व्हायरल व्हिडिओची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. सध्या या घटनेची कोणतीही तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली नसून, व्हायरल झालेल्या व्हिडियोची दखल घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.