Women Fight in Bus: आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक जास्त वापरली जाते. सार्वजनिक वाहतुकीत मारामारीच्या घटना वारंवार घडत असतात आणि यासंबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बस, ट्रेन किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीमध्ये पुरुष आणि महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. आता असेच एक प्रकरण पाहायला मिळाले आहे. भरधाव येणाऱ्या बसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दोन संतप्त महिला ‘मोफत बस सीट’वरून जोरदार भांडताना दिसत आहेत.

धावपळीच्या जगात रोज प्रवास करताना आपण बस, ट्रेन, टॅक्सी अशा वाहतूक साधनांचा वापर करतो. मात्र, हा प्रवास गर्दीचा असल्यामुळे अनेक लोकांसोबत जागा मिळविण्यावरून थोडी बाचाबाची होते. मात्र, कधी कधी लोकांमध्ये जागेवरून तुंबळ हाणामारी किंवा भांडणंही पाहायला मिळतात. अनेकदा प्रवासादरम्यान सीटवरून प्रवाशांमध्ये वाद झालेले हे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय; जो चांगलाच व्हायरल होतोय.

(हे ही वाचा: जंगलात ठेवला होता आरसा; स्वतःला पाहून बिबट्याने जे केले ते पाहून तुम्हीही जोरजोरात हसायला लागाल!)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ तेलंगणातील असल्याची माहिती आहे. त्यामध्ये महिला प्रवासी एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसेल की, बसमध्ये एकाच सीटवरून हे वाद सुरू आहेत. एका सीटवर बसण्यासाठी दोन बायकांमध्ये तुफान ‘युद्ध’ सुरू आहे. त्या दोन्ही महिला इतक्या जोरजोरात भांडतायत की बस! भांडताना त्या एकमेकांचे केस ओढतायत. एकमेकींच्या अंगावर धावून जातायत. त्यांची हाणामारी इतकी धोकादायक होती, की बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करण्याचीही हिंमत केली नाही.

सर्व जण त्यांच्या हाणामारीकडे मूक प्रेक्षकाप्रमाणे पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून कर्नूल शहराकडे जात होती. बसमध्ये जागा मोकळी ठेवल्याने दोन्ही महिला एकमेकांशी भांडल्या. त्या दोघींनी कहरच केला. एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शिवीगाळ सुरू केली. त्याच वेळी मुखदर्शन देत उभ्या असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeluguScribe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाख ७३ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडिओवर युजर्स त्यांच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. महिलांना मोफत सीटची सुविधा नसावी, असे अनेक युजर्सचे मत आहे.