Viral Video: अनेकदा प्रवासादरम्यान प्रवासी, रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात गाडी चालकांबरोबर भांडण होते. अशा भांडणात कोणी मध्यस्ती केली तर बरं नाही तर कधी कधी हे भांडण इतकं टोकाला जाते की, हाणामारी पर्यंत देखील जाऊन पोहचते. तर आज असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकदा बसमध्ये सीट पकडण्यासाठी प्रवासी अगदोरच रुमाल टाकून ठेवतात, किंवा बॅग ठेवतात. जेणेकरून त्यांना गर्दीत आरामात सीट मिळेल. पण, आज व्हायरल व्हिडीओत काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आहे. दोन संतप्त महिलां ‘मोफत बस सीट’ वरून जोरदार भांडताना दिसत आहेत. नेमकं कशावरून वाद झाला, नक्की काय घडलं या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडीओ तेलंगणामधील आहे. हा व्हिडीओ ११ जून रोजीचा आहे. एका वेगवान बसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण सुरु आहे. बसमध्ये झालेल्या वादानंतर दोन महिला एकमेकांचे केस ओढताना, एकमेकींना चापट मारताना दिसत आहेत. बसमध्ये महिला एकमेकांशी भांडत आहेत हे पाहूनही बस कंडक्टर, ड्रायव्हर आणि इतर प्रवासी भांडण थांबवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाही आहेत. धावत्या बसमध्ये भांडणाऱ्या दोन महिलांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच…

हेही वाचा…यूपीएससी परीक्षेत मिळालं यश; कुटुंबाने ढोल-ताशासह केलं स्वागत; ‘तिच्या’ घरवापसीचा हा VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बसच्या काही सीट रिकामी आहेत. तर काही सीटवर प्रवासी बसलेले दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओतील बस हैदराबादहून नगरकुर्नूल जात होती. यादरम्यान दोन महिला या बसमधून प्रवास करत होत्या. एक महिला खिडकीच्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसलेली असते. तर दुसरी महिला तिच्या सीटजवळ जाऊन बहुधा सीटवर कोणी बसायचा यावरून भांडताना दिसत आहेत. पहिल्यांदा उभी असलेली महिला सीटवर बसलेल्या महिलेला मारताना दिसत आहे. त्यानंतर सीटवर खिडकीपाशी बसलेल्या महिलेचा राग अनावर होतो व ती सुद्धा अज्ञात महिलेला मारण्यास सुरुवात करते.

हळूहळू भांडण एवढं वाढत की, दोघी एकमेकींचे केस ओढण्यास सुरुवात करताना, एकमेकांना मारू लागतात. हे पाहता बसमध्ये उभी असणारी एक व्यक्ती महिलांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसते व दोन्ही महिला काही केल्या ऐकलायला तयार नसतात आणि पुढे व्हिडीओचा शेवट होतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeluguScribe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि अशा महिलांना बसमध्ये बसायला जागा देऊ नयेत असा सल्ला देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.तसेच अनेक वापरकर्त्यांनी अशा हिंसक घटनांमध्ये वाढ होण्यासाठी फ्री सीट उपक्रमाला जबाबदार धरले आहे.