Fight over Land Video Viral: अनेक वर्षांपासून जमीन, प्रॉपर्टीवरून कुटुंबामध्ये किंवा अन्य कोणाबरोबर होणारे वाद आपण अनेकदा ऐकले असतील. या वादात बऱ्याचदा हिश्शावरून भांडणं होत असतात. पण, काही स्वार्थी लोक फ्रॉड करून जमीन किंवा प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतात आणि त्यावर आपला हक्क गाजवतात. या प्रॉपर्टीवरून होणारे वाद खूप टोकाला जातात आणि यासाठी माणसं एकमेकांचा जीव घ्यायलादेखील मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडलीय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात जमिनीवरून झालेल्या वादामुळे कुटुंबातले १२ पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

FPJच्या वृत्तानुसार छतरपूर येथे शनिवारी जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत १२ पेक्षा अधिक जण जखमी झाले. साक्षीदारांनी रेकॉर्ड केलेला या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जमिनीच्या वादातून शनिवारी सायंकाळी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कररी गावात ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोक लाठ्या-काठ्यांनी मारताना दिसत आहेत. या हिंसाचारात स्त्रियाही सामील झालेल्या दिसत आहेत; त्याही पुरुषांना क्रूरपणे मारताना दिसत आहेत. काही पुरुष महिलांचे केस ओढताना आणि मारहाण करताना दिसतात; ज्यामुळे भांडण अगदी टोकाला जातं.

हेही वाचा… ‘तो’ दोन तास शेजारी उभा होता; पण महिलेने रिकाम्या सीटवरून काढला नाही पाय, ट्रेनमधील ‘हा’ VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?

या भांडणात पुरुष, महिला आणि लहान मुलांसह १२ हून अधिक लोक जखमी झाले. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. कररी गावातील मुन्ना लाल सोनी याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधकाम सुरू केलेल्या जमिनीवरून त्यांच्यात हा वाद आहे. तर, दुसऱ्या बाजूला नथुराम सोनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही जमीन त्यांची वडिलोपार्जित संपत्ती असल्याचा दावा करत बांधकामावर आक्षेप घेतला. त्यांनी पोलीस आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलावले. अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन केल्यानंतर परिस्थिती शांत झाल्याचे दिसत होते.

तथापि, मुन्ना लालने बांधकाम पुन्हा सुरू केले; ज्यामुळे नथुराम आणि त्याच्या कुटुंबाचा राग आला. त्यांनी मुन्ना लाल व त्यांच्या कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आणि परिस्थितीचं लगेचच हिंसक भांडणात रूपांतर झालं. मुन्ना लालच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर दिलं आणि संघर्ष अधिक तीव्र झाला. या भांडणात दोन्ही कुटुंबातील अनेक जण जखमी झाले.

जमिनीच्या वादावरून वयोवृद्धाला मारहाण

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @FreePressMP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओत एक कुटुंब एका वयोवृद्ध माणसावर जोरदार हल्ला करीत असल्याचं दिसत आहे. तसंच एक तरुणी त्यांचा मार खात वयोवृद्धाला या हल्ल्यापासून वाचवताना दिसत आहे.

हेही वाचा… स्वत:चा जीव गेला पण…, बस चालकाने शेवटच्या क्षणी दाखवली माणुसकी, २० चिमुकल्यांचे वाचवले प्राण, पाहा थक्क करणारा VIDEO

दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही पक्षांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात जाऊन एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. छतरपूर येथील सिव्हिल लाईनचे स्टेशन प्रभारी वल्मीक चौबे यांनी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याची पुष्टी केली असून, तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.