Delhi metro Fight Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे दिल्लीची मेट्रोदेखील अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया युजर्ससाठी दिल्ली मेट्रोतील व्हायरल झालेले व्हिडीओ पाहणं ही गोष्ट आता काय नवीन राहिलेली नाही. प्रवाशांच्या सुखसोईंसाठी असणारी ही मेट्रो आता काही जणांसाठी मनोरंजनाचा भाग झाली आहे.
मुंबई लोकल ट्रेन असो किंवा दिल्ली मेट्रो; प्रवासादरम्यान लोकांमध्ये अनेकदा भांडण होतच असतात. आता ही भांडणं सर्वांसाठीच नेहमीची झाली आहेत. या भांडणात अनेक जण आपापल्या मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडणं मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन तरुणांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय, नक्की काय घडलं ते पाहूया.
तरुणाने धमकी दिली अन्… (Delhi Metro Fight Video)
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण अर्धनग्न होऊन दुसऱ्या तरुणाला मारामारी करण्यासाठी प्रवृत्त करतोय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, अर्धनग्न असलेला तरुण म्हणतो, “कमऑन कमऑन, शो सम पंचेस” यावर समोर असलेला दुसरा तरुण मेट्रोत असलेल्या प्रवाशांना पाहून म्हणतो की “हा खूप घाणेर्ड घाणेर्ड बोलतोय.” दोघांची भांडण थांबवण्यासाठी मेट्रोमधील प्रवासी मध्यस्थी करतात आणि अर्धनग्न असलेल्या तरुणाला तू आवाज कमी कर असं सांगतात यावर तो तरुण म्हणतो “मी बाहेरून आलोय म्हणून तुम्ही फक्त मलाच बोलतोय, त्याला काहीच बोलत नाही आहात.” व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनवरून त्या तरुणाने समोरच्या तरुणाचं आधी शर्ट फाडलं आणि त्याला मारामारी करण्यास प्रवृत्त केलं.
तेवढ्यात मेट्रो एक स्टेशनवर थांबते आणि तो शर्टलेस असलेला तरुण दुसऱ्या तरुणाला म्हणतो, “चल उतर मारामारी करू”. दरम्यान, हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधला असला तरी हे घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दिल्ली मेट्रोमध्ये एका माणसाने सहप्रवाशाचा शर्ट फाडला, त्याला मारामारी करण्याचे आव्हान दिले” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो नशेत असल्यासारखा वाटतोय,म्हणूनच असा वागतोय.” तर दुसऱ्याने “लोक त्या लहान मुलीला वाचवण्यापेक्षा तिचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त आहेत.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कृपया त्याला योग्य शिक्षा द्या”