Girls Fight Viral Video : आजकालच्या तरुण पिढीकडे संयम नाही, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण- अगदी क्षुल्लक कारणावरूनही ते इतके टोकाला पोहोचतात की, आपण त्याबाबत विचार करू शकत नाही. मुलं असो वा मुली क्षुल्लक कारणावरूनही रागावतात. रागाच्या भरात ते इतके टोकाला पोहोचतात की, एकमेकांवर हात उचलतानाही मागे-पुढे पाहत नाहीत. अनेकदा अशा अगदी छोट्या गोष्टीवरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचते. सध्या सोशल मीडियावर एका उच्चभ्रू कॉलेजमधील दोन तरुणींमधील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात दोघांची एकमेकींना मारतानाची आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

दोघींनी एकमेकींच्या कानशिलात लगावली अन्…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका वर्गात काही तरुण-तरुणींचा ग्रुप बसला आहे. याच वेळी ग्रुपमध्ये दोन तरुणींमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार भांडण होते. मग काही क्षणांत त्या भांडणाचे रूपांतर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचते. त्यातील एक तरुणी भरवर्गात दुसरीच्या कानशिलात लगावते, ज्यामुळे भांडण विकोपाला जाऊन पोहोचते. दोन्ही तरुणी अगदी कुस्तीच्या आखाड्यात असल्याप्रमाणे एकमेकींना धोपटून काढतात. त्या दोघी एकमेकींच्या जोरात कानशिलात लगावतात. त्यानंतर झिंज्या पकडून एकमेकांना मारू लागतात. त्या दोघींपैकी एक तरुणी बाकावर बसलेल्या दुसऱ्या तरुणीच्या पाठीत जोरजोरात बुक्के घालू लागते. हाणामारीमध्ये या तरुणींनी संपूर्ण वर्गखोली जणू डोक्यावर घेतली होती.

मित्र-मैत्रिणी भांडण सोडवण्याऐवजी हसून घेत होत्या आनंद

धक्कादायक बाब म्हणजे दोघींचे भांडण सुरू असताना आजूबाजूला बसलेल्या त्यांच्या मित्र-मैत्रिणी भांडण सोडवण्याऐवजी हसून आनंद घेत होत्या. अखेर भांडण वाढतच असल्याचे पाहून काही जण पुढे येतात आणि दुसऱ्या तरुणीला खेचत बाजूला घेऊन जातात. पण, त्या कोणाचेही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. एका उच्चभ्रू कॉलेजलमधील ही घटना पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

@MithilaWaala नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे; जो आत्तापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. काहींनी म्हटलेय की, या तरुणींना कॉलेज प्रशासनाने तातडीने कडक शिक्षा केली पाहिजे. तर काहींनी, कॉलेजमध्ये अशा प्रकारच वागणं या तरुणींना शोभते का, असा सवाल केला आहे.