Passenger And Bus Driver Fighting Video : बसचालक आणि प्रवाशांमध्ये मारामारी होणे ही गोष्ट भारतात सामान्य आहे. अनेकदा क्षुल्लक कारणावरून बसचालक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. काही वेळा या वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचते. भररस्त्यात प्रवासी आणि बसचालक एकमेकांना मारताना दिसतात. अनेकदा याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना सहन करावा लागतो. पण केवळ भारतातच नाही, तर परदेशांतही प्रवासी आणि बसचालक एकमेकांशी बेपर्वाईने वागत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात एक महिला प्रवासी महिला बसचालकाच्या शर्टची कॉलर पकडून, तिला मारताना दिसतेय. इतकेच नाही, तर बसचालकाला बसमधून फरफटत बाहेर काढते आणि त्यानंतरही तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करते.

बस तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद

ही घटना लॉस एंजेलिसमधील असल्याचे सांगितले जात आहे. बसच्या तिकिटाचे पैसे देण्यावरून एका महिलेने चालकावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. संबंधित महिला प्रवाशाने प्रवास करताना तिच्या बस तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जाते. पण, लोकसत्ता डॉट. कॉम अशा कोणत्याही व्हायरल व्हिडीओची पुष्टी करीत नाही.

हेही वाचा – क्षणात होत्याचं नव्हतं! भरधाव कारने एकाच वेळी उडवले चौघांना; अंगाचा थरकाप उडविणारा VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला प्रवासी महिला बसचालकाला बसमध्येच मारहाण करण्यास सुरुवात करते. त्यानंतर महिला त्या महिला बस चालकाच्या शर्टची कॉलर पकडून, तिला बसमधून फरफटत बाहेर ओढत आणते आणि पुन्हा मारहाण करू लागते. ही महिला चालकाच्या कॉलरला अगदी घट्ट पकडून कानशिलात लगावते. त्यानंतर प्रतिकार म्हणून चालक तिला लाथेने मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती पुन्हा बसमध्ये जाऊन चालकाला मागून बुक्के मारून पकडून बाहेर खेचत आणते. दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

लोक अशा वेळी मदत का करीत नाहीत?, युजर्सचा सवाल

अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, “ही महिला तिचे पैसे मिळविण्यासाठी ड्रायव्हरशी भांडत होती का,” असा सवाल केला आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले, “तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की, अशा गोष्टींचे व्हिडीओ बनविणारे कोणीतरी लोक असतात; पण ते कधीच अशा वेळी मदत करत नाहीत.” तिसऱ्या एका युजरने म्हटले, “लोक अशा वेळी मदत का करीत नाहीत? हे खूप वाईट आहे.”

लॉस एंजेलिस टाइम्सच्या वृत्तानुसार, बसचालकावर हल्ला करणारी महिला बेघर आहे. पण, अशा प्रकारे देशभरातील बसचालकांना प्रवाशांकडून वाढत्या विरोधाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ट्रान्झिट कामगारांवरील हल्ला झालेल्या घटनांची संख्या गेल्या १५ वर्षांत तिप्पट झाली आहे.

Story img Loader