FIITJEE Chairman abused employee: ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कंपनीतील कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. अनेक कंपनीत जास्त काम करून घेणे, वेळेत पगार न देणे, सुट्ट्या कमी देणे किंवा त्यांना वाटेल तसं बोलून आपलं वर्चस्व गाजवणे अशा गोष्टी होत असतात. या सगळ्यावर वेळेत कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला तर ठीक, नाही तर कंपनीत मोठ्या पदावर असणारे अधिकारी त्यांना दुय्यम वागणूक देऊन त्यांना नको नको ते बोलतात. सध्या असाच प्रकार एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये झाला आहे, जिथे अध्यक्षांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. एवढंच नव्हे तर आपली मर्यादा ओलांडत त्यांनी कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांबद्दलही अपशब्द वापरले.

अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट FIITJEE च्या चेअरमनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते अधिकृत ऑनलाइन मीटिंगदरम्यान त्यांच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करताना दिसतायत. FIITJEE चे चेअरमन डी. के. गोयल मीटिंगदरम्यान एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना दिसल्याने व्हायरल क्लिपमुळे वाद निर्माण झाला आहे.

Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bigg Boss 18 chahat pandey talks about boyfriend with kashish Kapoor watch video
Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
Image Of Harsh Goenka.
L&T Chairman : “रविवारचे नाव ‘Sun-Duty’ करा”, रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या एल अँड टी च्या अध्यक्षांना अब्जाधीशाचा टोला
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

हेही वाचा… VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका

संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या विलंबित पगारावर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात ही मीटिंग झाली होती आणि गोयल यांच्याशी बोलून कर्मचाऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, ठाणे शाखेतील एका कर्मचाऱ्याने ईडी-टेक उद्योगात कंपनीच्या अलीकडच्या गुंतवणुकीबाबत विचारणा केल्याने गोयल संतापले. रागाच्या भरात गोयल यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण, शिवीगाळ करून शांत न राहता अध्यक्षांनी यात कर्मचाऱ्याच्या आईवरूनदेखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

चेअरमनने ओलांडली मर्यादा

या व्हिडीओमध्ये गोयल ओरडताना आपण ऐकू शकतो, “असभ्यतेची एक मर्यादा असते. हा जो कोणी माणूस आहे त्याला मला FIITJEE मध्ये बघायची इच्छा नाही. जर तुम्ही तुमच्या वडिलांचे अपत्य असाल तर तुम्ही जुने १.४२ कोटी रुपये गुंतवले आहेत हे सिद्ध करा… यानंतर खूप शिवीगाळ करून गोयल म्हणतो, “नकारात्मक गोष्टी बोलत आहात, मनीषजी, कृपया या व्यक्तीला येथून हाकलून द्या, मला या व्यक्तीला बघायचे नाही, कृपया कायदेशीर कारवाई करा.” Your mother must be from red light area (तुझी आई रेड लाईट एरियामधून आली असेल) आणि मी हे बोललो याची तू कोर्टात तक्रार कर”, असंही तो म्हणाला.

हा व्हिडीओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा FIITJEE चे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून पगाराच्या विलंबाचा संघर्ष करत आहेत. गोयल यांच्यासोबतची ऑनलाइन व्हिडीओ मीटिंग कर्मचाऱ्यांना त्यांच्या शंका व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी होती, पण या मीटिंगमध्ये काही भलतंच घडलं.

हेही वाचा… “चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय

हा व्हिडीओ @ankituttam या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “FIITJEE संस्थापक सर्व केंद्र प्रमुखांच्या मीटिंगमध्ये अपमानास्पद भाषा वापरताना दिसतात,” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

युजर्सच्या संतापजनक प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कंपनीचे अध्यक्ष या नात्याने, नम्रपणे समस्या ऐकून घ्याव्यात आणि शिवीगाळ करण्याऐवजी काही उपाय योजले पाहिजेत.” तर दुसऱ्याने “टॉक्सिक वर्क कल्चर” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “कृपया तुमच्या मुलांना अशा संस्थांमध्ये पाठवण्यापूर्वी दोनदा विचार करा. ते शिकवण्याच्या व्यवसायात आहेत आणि त्यांच्या सिनिअर्सची भाषा पाहा. खरंच दयनीय.” “तुम्ही हवं तर तुमच्या संस्थेतून कर्मचाऱ्याला हाकलून द्या, पण आईला शिव्या देणं खूप चुकीचं आहे,” अशी कमेंट एकाने केली.

Story img Loader