सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये महापूर आल्यासारखी परिस्थिती झाली होती. मुसळधार पावसानं हैदराबादला अक्षरशः झोडपून काढलंय. संध्याकाळच्या वेळी अचानक, अनपेक्षित ढगफुटीने लोकांची धावपळ झाल्याचं अनेक भागात दिसलं. रस्त्यांना तर नद्यांचं स्वरूप आलं होतं. त्यामुळं वाहनं चालवताना चालकांना कसरत करावी लागली. काही घरांमध्ये, कार्यालयांमध्ये पावसाचं पाणी घुसलं होतं. हैदराबादमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याठिकाणचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये रस्त्यांवरच काय तर थिएटरसुद्धा पाण्याखाली गेलंय. याचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबादमधल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केलं. इथली अनेक घरे आणि रस्त्यांप्रमाणेच चक्क थिएटसुद्धा पाण्याखाली गेले होते. या महापूराचा सर्वात जास्त फटका दिलशुक नगर भागाला बसला आणि त्यामुळे इथले लोकही भयभीत झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सरूर नगरमधला असल्याचं सांगितलं जातंय. हैदराबादमधल्या महापूरात हे इथलं ‘एशियन शिव गंगा थिएटर’ अक्षरशः पाण्याखाली गेलं.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये थिएटरमध्ये सगळीकडे पाणीच पाणी दिसून येतंय. थिएटरमधील ज्या खुर्च्यांवर बसून स्क्रीनवर आपल्या आवडत्या कलाकारांचा अभिनय पाहिला, त्या खुर्च्या वाहत्या पावसाच्या पाण्यात बुडाल्या होत्या. अगदी निश्चित सांगायचे झाले तर स्क्रीनसमोरील पहिल्या पाच रागांवर पाणी विराजमान होते.

तसंच थिएटरमधल्या वरील खुर्च्याांच्या रांगांमधून अगदी नदीला जसं पाणी वाहतं त्याप्रमाणे पाणी वाहू लागलं. खुर्च्यांच्या आडून वाहत येणारं हे पाणी थिएटरमधल्या स्क्रीनपर्यंत पोहोचताना दिसून येतंय. दुसरीकडे, या पाण्याच्या प्रवाहामुळे थिएटरची भिंत सुद्धा कोसळल्याची घटना घडली. यात जवळपास ३०-४० बाइक वाहून गेल्याचं सांगण्यात येतंय.

शनिवारी सकाळी थिएटरची पाहणी करण्यासाठी आलेल्या जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांनी थिएटर मालकांना थिएटरच्या भिंतीचा ढिगारा साफ करण्यासाठी आणि त्याखाली अडकलेली वाहने बाहेर काढण्यास सांगितले.

करोनाच्या संकटकाळात अगोदरच गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर मालकांचं भरपूर नुकसान झालंय. त्यात आता महापूराने या नुकसानीत आणखी भर घातली आहे. महापूरात पाण्याखाली गेलेल्या थिएटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film theater gets flooded with rainwater in hyderabad video goes viral prp