झारखंडमधील एका शेतकऱ्याने महिंद्रा फायनान्स नावाच्या कंपनीकडून ट्रैक्टर फाइनेंस काढला होता. जेणेकरून त्याच्या शेतीच्या कामातून तसेच ट्रॅक्टर चालवण्याच्या इतर पर्यायांमधून त्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल. पण फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर घेणे त्याला महाग पडले. कंपनीच्या एजंटने याच ट्रॅक्टरने दिव्यांग शेतकरी मिथिलेश मेहता यांच्या गरोदर मुलीला चिरडून ठार केले. मृत महिला तीन महिन्यांची गर्भवती होती.
हजारीबाग जिल्ह्यातील इचक येथील मिथिलेश मेहता या वेगळ्या दिव्यांग शेतकऱ्याला एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करणे इतके महागात पडले की, त्याला आपल्या मुलीचा जीव देऊन त्याची किंमत चुकवावी लागली. मिथिलेश मेहता यांची २७ वर्षीय गर्भवती मुलगी मोनिका हिला फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटांनी ट्रॅक्टरने चिरडून ठार केले. वास्तविक हजारीबाग जिल्ह्यातील इचक येथील शेतकरी मिथिलेश ठाकूर यांनी महिंद्रा फायनान्स नावाच्या कंपनीकडून ट्रॅक्टर खरेदी केला होता, त्याच ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यास उशीर झाल्यामुळे फायनान्स कंपनीचे एजंट ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी आले होते. थकबाकीवरून वाद झाल्यानंतर फायनान्स कंपनीच्या एजंटांनी ट्रॅक्टर जबरदस्तीने नेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेतकरी मिथिलेशची मुलगी मोनिकाने कंपनीच्या एजंटांना ट्रॅक्टर नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याच ट्रॅक्टरने मोनिकाला तुडवले. उपचारादरम्यान गर्भवती मोनिकाचा मृत्यू झाला.
( हे ही वाचा: राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डेव्हिड बेकहॅम तब्बल १२-१३ तास सामान्य लोकांच्या रांगेत; Video झाला व्हायरल)
१ लाख २० हजार रुपये मृत्यूचे कारण ठरले
हजारीबाग येथील शेतकरी मिथिलेश मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी कंपनीकडून १,२०,००० रुपयांचा थकबाकीचा हप्ता जमा करा, असा मेसेज आला, परंतु मिथिलेश ही रक्कम देय तारखेला जमा करू शकला नाही. दरम्यान, गुरुवारी त्यांचा ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर उभा होता, त्याचवेळी एका कारमधून चार जण आले आणि त्यातील एकाने खाली उतरून ट्रॅक्टर सुरू केला. त्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने मिथलेश मेहता यांना याबाबत माहिती दिली. शेतकरी मिथिलेश आणि त्यांची मुलगी मोनिका यांनी ट्रॅक्टरच्या मागे धावत ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या एजंटला थांबवले.
ओळखपत्र मागितल्यावर माणूस सांतापला
मिथलेश आणि मोनिका थांबल्यावर ट्रॅक्टर सोबत मागून धावणारी कारही थांबली, इतक्यात एक व्यक्ती गाडीतून बाहेर आली आणि म्हणाला एक लाख २० हजार रुपये घेऊन ऑफिसला पोहोच. तेव्हा मिथिलेश म्हणाला की मी पैसे आणले आहेत, पण तुम्ही लोक तुमची ओळख सांगा. यावर शेतकरी मिथिलेशने ओळखपत्र मागितले असता आरोपीने स्वत:ला महिंद्रा फायनान्सचे झोनल मॅनेजर असल्याचे सांगितले. हे ऐकून आरोपीला राग आला आणि त्याने टॅक्टर चालवण्याचा आदेश दिला. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी मोनिकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाने तिला चिरडले गेले.
( हे ई वाचा: VIDEO : मुलगी रिल बनवत असताना गायीला आला राग; मग गाईने केले असे काही की…पहा Video)
सदर घटनेचा तपास सुरू झाला आहे
ट्रॅक्टरने चिरडल्याने जखमी झालेल्या मोनिकाचा रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचवेळी हजारीबागचे एसपी मनोज रतन चोथे म्हणाले, ‘ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची चौकशी केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांच्या माहितीशिवाय एजंट वसुली कशी करतात, याचाही तपास केला जाणार आहे. लवकरच सर्व आरोपी तुरुंगात येतील.