Fish Brain Teaser : सोशल मीडियावर ऑप्टिक इल्यूजनचे जबरदस्त फोटो व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांचे फोटो असतात तर कधी नंबरचा खेळ असतो. पण या फोटोंची खासीयतही वेगळी असते. कारण हे फोटो दिसायला आकर्षक असले, तरी या फोटोमध्ये बुद्धीचे डावपेच आखण्याची कमाल असते. कार्यालयीन कामात हुशार असणारी सर्वच माणसं या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये पास होतातच असं नाही. कारण ज्यांच्याकडे तीष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असते, तीच माणसं हे कोडं सोडवण्यात यशस्वी होतात. आताही माशाचा एक भन्नाट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
या फोटोत वेगवेगळे नंबर दाखवण्यात आले आहेत. पण १ नंबर कुठे आहे? हे शोधण्यात ९९ टक्के लोकांना अपयश आलं आहे. पण जी माणसं खूप हुशार आहेत, त्यांना १ नंबर शोधण्यात यश मिळेल, फक्त त्यांनी त्यांच्या बुद्धीचा योग्य वापर केला पाहिजे. विशेष म्हणजे तुम्हाला १ नंबर शोधण्यासाठी फक्त १० सेंकदांचाच वेळ मिळणार आहे.या ब्लॅक अॅंड व्हाईट फोटोत गोल्डफिश पाण्यात पोहताना दिसत आहे. माशाच्या जवळपास काही नंबर दाखवण्यात आले आहेत. पण या फोटोत १ नंबर शोधणं इतकं सोपं नाहीय.
नक्की वाचा – काळ आला होता पण वेळ नाही! घाटात प्रवास करणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडीओ मिस करू नका
ज्यांना गणित कच्च आहे, त्यांना तर हे खूप अवघड जाणार आहे. पण ज्यांना आयक्यू टेस्ट देण्याचा सराव आहे, अशी माणसं हा नंबर शोधण्यात यशस्वी होऊ शकतात. पण त्यांच्यासाठी फक्त १० सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. तर मग आता तुमची वेळ सुरु झाली आहे. १०,९,८,७,६,५,४,३,२ आणि १. आता तुमची वेळ संपलेली आहे. काही माणसांनी त्यांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये शेअर केलं आहे.
काहींनी वेळेच्या आधीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींचा या फोटोत लपलेला १ नंबर शोधण्यात अजूनही गोंधळ उडालेला दिसतोय. जर तुम्ही १ नंबर शोधण्यात खरंच यशस्वी झाला असाल, तर तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमच्याकडे नक्कीच गरुडासराखी नजर असेल, त्यामुळेच तुम्हाला हा नंबर वेळेत शोधण्यात यश मिळालं असेल. जर तुम्ही १ नंबर शोधू शकला नाहीत. तर खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला १ नंबर कुठे आहे, ते पाहता येईल.