Check Your IQ Level : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांच्या बुद्धीला दिवसेंदिवस चालना देत आहेत. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनात मेंदुला योग्य वळण लागण्यासाठी अशाप्रकारचे फोटो व्हायरल केले जातात. शाळेतील परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे वाटत असेल, पण अशा ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये पास होणं तितकच अवघड. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीकसारीक गोष्टी पाहण्यासाठी गरुडासारखी तीक्ष्ण नजर लावावी लागते. आताही सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा एक भन्नाट फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत वेगवेगळी झाडे निसर्गाच्या कुशीत लपलेली दिसत आहे. परंतु, या फोटोत एक स्त्री सुद्धा लपली आहे. ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसं या फोटोत लपलेल्या स्त्रीला ५ सेकंदात शोधू शकतात. तुम्ही हुशार असाल तर शोधून दाखवा.

फोटोत पाच हिरवीगार झाडे दिसत आहेत आणि झाडांवर निरभ्र आकाशही आहे. हिरव्यागार निसर्गाचं दर्शन तर झालंच आहे. पण झाडांच्याजवळ लपलेली स्त्री शोधणं काहीसं अवघड आहे. कारण यासाठी तीक्ष्ण नजर आणि बुद्धीचा कस लावावा लागेल. ज्यांना या झाडांमध्ये लपलेली स्त्री दिसली असेल, त्या सर्वांचं अभिनंदन. ही टेस्ट पास होण्यासाठी कशाप्रकारे बुद्धी वापरली हे तुम्ही प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगू शकता. पण ज्यांना ५ सेकंदात स्त्री ला शोधता आलं नाही, त्यांना आम्ही या फोटोमध्ये दडलेलं रहस्य सांगणार आहोत. कारण तुम्हाला दिलेली ५ सेकंदांची वेळ आत्ता संपली आहे. तुम्हाला बॅलेरीन नृत्यू करणारी स्त्री या फोटोत दिसली नसेल तर काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला अचूक उत्तर सांगणार आहोत.

नक्की वाचा – VIDEO: इंडिगो विमानात बंद झाला AC! थंड हवेसाठी प्रवाशांनी केलेला जुगाड पाहून एअरहोस्टेसही झाल्या थक्क

इथे पाहा ऑप्टिकल इल्यूजनच फोटोचं अचूक उत्तर

Correct Answer Of Optical Illusion
Optical Illusion Correct Answer

फोटोत असलेल्या पाच झाडांमध्ये तुमच्या डाव्याबाजूकडून असलेलं दुसरं झाडं बारकाईने पाहिलं, तर बॅलेरीना नृत्य करणारी स्त्री तुम्हाला दिसेल. या झाडाचं खोड अगदी हुबेहुब बॅलेरीना नृत्य करणाऱ्या स्त्रीसारखं आहे. ज्यांनी बुद्धीचा योग्य वापर केला असेल, त्यांना या झाडात बॅलेरीना नृत्य करणाऱ्या स्त्रीला शोधण्यात यश आलं असेल. पण ज्या लोकांनी या परीक्षेकडे गांभिर्याने पाहिलं नसेल, ती माणसं यात नक्कीच फेल झाली असतील. अशा ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये दिलेल्या वेळेत पास होण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो. तेव्हाच अशाप्रकारचे कोडे सोडवण्यात यश मिळतं.