Find Correct Animal In Optical Illusion Viral Photo : दिवसेंदिवस ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो माणसांच्या मेंदूला आव्हान देत आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्षांचे फोटो अचूकपणे ओळखण्यासाठी लोकांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम ऑप्टिकल इल्यूजन टेस्टच्या माध्यमातून केलं जात आहे. आताही तामिळनाडूच्या ऐरावतेश्वर मंदिरातील भिंतीवर कोरलेला फोटो व्हायरल झाला असून लोकांच्या बुद्धीला कस लागणार आहे. कारण या मंदिरात कोरलेल्या एका चित्रात बैल आहे की हत्ती? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांचा गोंधळ उडाला आहे. परंतु, ज्यांची बुद्धी तल्लख आहे आणि नजर तीक्ष्ण आहे, अशा लोकांना चित्रात नेमका कोणता प्राणी आहे, याचं उत्तर शोधता येणार आहे. पण त्यांच्यासाठीही हे एक मोठं आव्हान असणार आहे. कारण अचूक उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला फक्त ५ सेकंदांचाच वेळ दिला जाणार आहे.
तामिळनाडूच्या या मंदिरात मुर्तीकारांनी कोरलेल्या या सुंदर चित्राच्या माध्यमातून लोकांना त्यांचं कौशल्य ओळखण्याची संधी मिळाली आहे. या चित्रात पहिल्यांदा कोणता प्राणी दिसतोय? असा प्रश्न अनेक लोकांना सतावत आहे. या फोटोवरूव सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव होताना दिसत आहे. @fasc1nate नावाच्या ट्विटर हॅंडलवर हा फोटो व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये जबरदस्त ट्वीटर वॉर रंगला आहे. कारण या चित्रात असलेल्या प्राण्यांबाबत लोकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इथे पाहा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो
तुम्हाला या चित्रात बैल आहे की हत्ती? या प्रश्नाचं उत्तर सांगत आलं नसेल, तर काही हरकत नाही. तसंही तुम्हाला दिलेली ५ सेकंदांची वेळ आता संपली आहे. या चित्रात नेमकं काय आहे? याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा फोटो व्हायरल होताच एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, मला असं वाटतंय की, हत्तीने बैलाला घेरलं आहे. त्यामुळे हत्ती स्पष्टपणे दिसत नाहीय. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे, हे दोन्ही प्राणी एकमेकांमध्ये गुंतले आहेत, त्यामुळे तुम्ही ज्या प्राण्याकचे तीष्ण नजरेने पाहाल तो प्राणी तुम्हाला आधी दिसेल.
म्हणजेच तुम्ही बैलाकडे पाहिलं तर तुम्हाला या चित्रात बैल असल्याचं वाटेल. पण दुसऱ्या बाजूला असलेल्या हत्तीकडे पाहिलं तर असं वाटेल हा प्राणी हत्तीच आहे. खरंतर या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत दोन प्राण्यांना अशाप्रकारे फिक्स करण्यात आलं आहे की, पहिला प्राणी कोणता आहे? हे सांगणच कठीण जाणार आहे. कारण ज्या मुर्तीकारांनी त्यांच्या बुद्धीला कस लावून प्राण्यांची अतिशय सुबक आखणी केली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या प्राण्याकडे लक्ष द्याल तोच प्राणी तु्म्हाला चित्रात असल्यासारखं वाटेल.