Find The Missing Number In 7 Seconds : ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्याचं मोठं आव्हान लोकांपुढं असतं. परंतु, आता व्हायरल झालेल्या एका फोटोत गणिताचं कोडं अनेकांना चक्रावून टाकत आहे. कारण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसंच हे अवघड गणित ७ सेकंदाच्या आत सोडवू शकतात. आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी गणित विषयाचं कोडं सोडवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यांनी ट्वीटरवर सुडोकूचा फोटो शेअर केला असून लोकांपुढे याचं अचूक उत्तर शोधाण्याचं आव्हान असणार आहे.
ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोत एक सर्कल बनवलेला दिसत आहे. या गोलाकार आकृतीत वेगवेगळे बॉक्स दिसत आहेत. या बॉक्समध्ये काही नंबर लिहिण्यात आले आहेत. २,३,४,५,५२०,१५,१० या आकड्यांमध्ये एक बॉक्स रिकामा आहे. या बॉक्समध्ये प्रश्नचिन्ह ठेवण्यात आला आहे. तुम्हाला याच रिकाम्या बॉक्सचं अचूक उत्तर सांगायचं आहे आणि तुम्हाला फक्त ७ सेकंदांचाच वेळ दिला गेला आहे.
इथे पाहा पोस्ट
आयएएस अधिकाऱ्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांनी या प्रश्नाचं उत्तर १ आणि २५ असं दिलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, रिकाम्या जागी १ नंबर येईल किंवा २५. या पोस्टला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, तुमचं उत्तर काय आहे? १२ सप्टेंबरला शेअर करण्यात आलेली ही पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली आहे.