Finland PM Sanna Marin Viral Video: फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी मित्रांसोबत केलेल्या एका पार्टीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातले होते. विरोधकांसह अनेक नेटकऱ्यांनी सुद्धा पंतप्रधान पदी असणाऱ्या सना यांना दारू पिऊन, ड्रग्ज घेऊन धिंगाणे करणे शोभत नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच ,मरीन यांनी लगेच ड्रग्ज टेस्ट देऊन हे सिद्ध करावे अशी मागणी सुद्धा केली होती. सुरुवातीला सना यांनी ड्रग्ज टेस्ट करायला नकार दिला होता मात्र आता विरोधकांसह सोशल मीडियावर होणाऱ्या मागणीनंतर त्यांनी चाचणी करून घेतली आहे. या ड्रग्ज टेस्टचा अहवाल सध्या समोर येत आहे.

फिनलँडच्या पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात याविषयी माहिती देण्यात आली आहे. १९ ऑगस्ट २०२२ ला पंतप्रधान सना मरीन यांनी ड्रग्ज टेस्ट करून घेतली होती, ज्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी सना यांनी स्वतः देखील आपण या पार्टीत मद्यपान केले होते मात्र ड्रग्ज सेवनाचा आरोप चुकीचा आहे असे ठाम सांगितले होते.

फिनलॅण्डच्या महिला पंतप्रधानांच्या Party Dance वरुन वाद पण ‘या’ नेत्यांचे डान्सही झालेले व्हायरल; पाहा Videos

व्हायरल व्हिडिओनंतर सना यांनी स्पष्टीकरण देत, हा आपल्या मित्रांच्या घरातील खाजगी पार्टीचा व्हिडीओ असल्याचे सांगितले होते. तसेच आपण आयुष्यात कधीच ड्रग्जचे सेवन केलेले नाही व या पार्टीमध्ये सुद्धा कोणीही ड्रग्ज घेतले नव्हते असे सना म्हणाल्या.

दरम्यान अशा प्रकारे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही पंतप्रधान मरीन यांची पहिलीच वेळ नाही यापूर्वी मागच्या वर्षी कोविड नियमावली मोडून त्या एका क्लब मध्ये गेल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यावर सना यांनी सर्वांची क्षमा मागितली होती. यावेळचा व्हायरल व्हिडीओचा वाद मात्र बराच गाजला होता. सना यांना समर्थन करणाऱ्या अनेक महिलांनी ट्विटर वर आपले डान्स व्हिडीओ शेअर करून त्यांना पाठिंबा दर्शवला होता तर विरोधकांनी सना यांना बेजबाबदार म्हणत नाराजीचा सूर धरला होता.

Story img Loader