Fire at Birthday: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाईट वेळ कधी सांगून येत नाही, म्हणून नेहमी जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. कोणती चूक कधी अंगाशी येईल आणि दुर्घटना घडेल हे काही सांगता येत नाही. आणि अशा दुर्घटनेत अनेकदा दुखापत होते किंवा काहींच्या जीवावरही बेततं.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात वाढदिवशी केक कापत असताना अचानक आगीचा भडका उडाला. नेमकं काय घडलं. ते जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का लागला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे मित्र मैत्रिणी जमा झाले आहेत. केक आणून तसंच सुंदर डेकोरेशन करून तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. पण यादरम्यान अचानक अशी घटना घटते ज्यामुळे तिथे भीषण आग लागते.
खरंतर होतं असं की, केक कापण्यासाठी उभी असलेली तरुणी केकवरची स्पार्कल कॅन्डल पेटवते. तेवढ्यात अचानक आगीचा भडका उडतो. केक कापत उभी असलेली तरुणी त्या आगीजवळच असते. ही घटना घटताच तिथून सगळे लांब पळ काढतात. ती तरुणीदेखील कशीबशी आपला जीव वाचवते आणि आगीपासून लांब पळून येते.
हा व्हिडीओ @raaaaaaaaaaaaaaamu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “RIP TO Common Sense” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
हेही वाचा… आयुष्याचा असा खेळ करू नका! सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का
यजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, नशीब मुलगी वाचली, नाहीतर काय झालं असतं. तर दुसऱ्याने बघून धक्काच बसला अशी कमेंट केली. एकजण कमेंट करत म्हणाला, “हे खूपच धोकादायक आहे, यापुढे स्पार्कल कॅन्डल पेटवताना काळजी घेतली पाहिजे.”