Fire breaks out at Cracker shop: दिवाळीच्या आधीच एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हैदराबादमधील रामकोट येथील फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरातील अनेक दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पारस या फटाक्यांच्या घाऊक दुकानात ही घटना घडल्याचं समोर आलंय. घडलेल्या या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका दुकानात फटाके फुटतात आणि ग्राहक घाबरून पळून जातात. फटाके फुटायला लागल्यानंतर दुकानात जमलेला ग्राहकांच्या गर्दीचा लोंढा बाहेर येण्यासाठी धावत सुटतो. एकमेकांना धक्का देत सगळे बाहेर येतात. या दुर्घटनेमुळे संपूर्ण दुकानाला भीषण आग लागल्याचे आणि प्रचंड नुकसान झाल्याचे या व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो.

हा व्हिडीओ @drunk.journalist या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. “दुकान काही मिनिटांतच पेटले आणि त्यादरम्यान लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. चांगली गोष्ट म्हणजे यात जीवितहानी झाली नाही. सर्वांनी सुरक्षित राहा,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… शेवटी विषय पोटा-पाण्याचा! दोन्ही हात गमावले असूनही स्कूटर चालवत करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून जिद्दीला कराल सलाम

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “दुकानदाराबद्दल खूप वाईट वाटतं. त्याचा सगळा साठा वाया गेला आणि नुकसानही झालं.” तर “हे खूप भयानक आहे. मी आशा करते की, सर्व जण सुरक्षित असतील,” अशी कमेंट दुसऱ्या युजरनं केली.

हेही वाचा… “मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, फटाके फुटत राहिल्यानं परिस्थिती आव्हानात्मक बनली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसून, घटनेचा तपास सुरू आहे.

हेही वाचा… परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

दरम्यान, पोलिसांनी पुष्टी केली की, हे दुकान बेकायदा चालवलं जात होतं, असं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटलं आहे. “दुकानाचं कोणतंही प्रमाणपत्र नाही. ते अवैध दुकान होतं. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू,” असं सुलतान बाजारचे सहायक पोलिस आयुक्त के. शंकर यांनी इंडिया टुडेला सांगितलं.