पालक आपल्या मुलांवर नि:स्वार्थी प्रेम करतात. असं म्हणतात की, आपल्या मुलाला संकटात पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणतेही पालक त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. कोणतंही संकट आलं, कठीण प्रसंग आला तरी आपला जीव धोक्यात घालून ते आपल्या लेकराचा जीव वाचवतात.

मात्र, सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओत घरात एका ठिकाणी आग लागलेली पाहून चिमुकल्याने पालकांना बोलावण्याचा प्रयत्न केला; पण पालकांनी त्याच्याकडे पाहिलेसुद्धा नाही.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

हेही वाचा… खतरनाक! सॅलडचा पिशवीत सापडला जिवंत प्राणी, VIRAL PHOTO पाहून तुम्हालाही फुटेल घाम

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की, एक लहान मुलगा टीव्ही बघत बसला आहे आणि बाकीचं कुटुंब त्याला एकट्याला सोडून डायनिंग टेबलवर पार्टी करीत बसले आहेत. लहान मुलाने टीव्ही सुरू करताच अचानक एक आवाज येतो आणि टीव्हीचं प्लग लावलेल्या स्विचमधून स्पार्क येतो व स्विच पेट घेतो. स्विचला आग लागल्याचे लक्षात येताच तो लहान मुलगा लगेच त्याच्या वडिलांना बोलावण्यासाठी जातो. डायनिंग टेबलवर बसलेल्या त्याचा वडिलांचा हात खेचतो; परंतु ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून तो स्वत:च या गंभीर घटनेला सामोरा जातो.

आग विझवण्याच्या प्रयत्नात असलेल्या लहान मुलाचं टीव्हीच्या बाजूला असलेल्या एका स्प्रेकडे लक्ष जाते. तो स्प्रे घेऊन, ती आग विझविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, एका स्प्रेमध्ये काहीच होत नसल्याने तो दोन-तीनदा स्प्रे मारून पाहतो आणि ती आग विझते.

हा व्हिडीओ @motivationl_words_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “उडे दिल बेफिकरे…”, धावत्या बाईकवर झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हटके डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची नोकरी जायला…”

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, या घटनेत मुलाला विजेचा झटकादेखील लागू शकला असता; पण त्याने अगदी हुशारीने परिस्थिती हाताळली. तर दुसऱ्याने, शाबास! बेटा शाबास, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला की, या अशा कुटुंबात एवढा हुशार मुलगा कसा काय जन्माला आला काय माहीत?

दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर पालकांचा निष्काळजीपणा दाखविणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यामुळे आजकाल पालकत्वाबाबत प्रश्न केला जात आहे.

Story img Loader