Bus Fire Video Viral : रस्त्यावर प्रवास करणाऱ्या गाड्यांना आग लागल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशा परिस्थितीत अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातच आता अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय महामार्गावर आगीचं तांडव झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बसमध्ये लागलेल्या आगीनं रौद्ररुप धारण करताच लोकांनी जीव मुठीत घेऊन पळापळ केली. या आगीच्या घटनेचा थरकाप व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवाशांनी भरलेल्या बसला लागली आग

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ खूप भितीदायक आहे. आगीच्या मोठ्या घटनांचे व्हिडीओ इंटरनेटवर अनेकदा व्हायरल झाले आहेत. ज्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली, त्या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अनेक गाड्यांच्या ताफ्यामधून ही बस प्रवास करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या बसच्या पुढे आणि मागे अनेक गाड्या प्रवास करत असताना बसच्या मागच्या बाजूला अचानक आग लागते आणि बघता बघता संपूर्ण बसमध्ये आगीचं तांडव सुरु होतं. बसला आग लागताच लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली.

इथे पाहा बसला आग लागलेला थरारक व्हिडीओ

आगीत जळून खाक झाली बस

बसला आग लागल्यानंतर भर रस्त्यात खळबळ माजते. आगीची तीव्रता इतकी भयंकर असते की, काही क्षणातच बस जळून खाक होते. या थरारक घटनेमुळं राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. त्यानंतर बचाव पथक बसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in bus on argentinas national highway people ran away to save their lives fire incident shocking video went viral nss