Fire In Wedding: कधी कधी अशा घटना समोर येतात, ज्या एकून आपलं मन सुन्न होतं. अशीच एक मन सुन्न करणारी घटना सध्या समोर आली आहे. लग्न समारंभात सगळीकडे आनंदोत्सव सुरु होता. नवविवाहित जोडपं हे मोठ्या उत्साहात डान्स करत होतं. पण तेवढ्यात साऱ्यांवर संकट कोसळलं. उत्तर इराकमधील निनेवेह प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील अल-हमदानिया जिल्ह्यातील एका गावात लग्नाच्या हॉलमध्ये आग लागल्यामुळे तब्बल १०० जणांचा बळी गेला आहे. तर १५० हून अधिक लोक जखमी आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेमुळे लग्नाचा उत्साह सुरु असलेल्या फंक्शन हॉलचे रुपांतर स्मशानभूमीत झाले. आगीच्या प्रकारानंतर घटनास्थळावरील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे जवान बचावलेल्या पाहुण्यांच्या शोधात इमारतीच्या जळालेल्या अवशेषांवर चढत असल्याचे दिसत आहे. लग्न मंडपाच्या बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणानं सजवला गेला होता. ज्यावर इराकमध्ये बंदी आहे. ही आग ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे लागली. ज्यामुळे लग्नमंडपाचा काही भाग कोसळला, अशी चर्चा आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं चित्र पाहू शकता, यासगळ्यात सर्वात जास्त मृत्यू हे लहान मुलांचे झ्लायीच माहिती आहे.

फुलांऐवजी पडले आगीचे गोळे पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुत्र्यानं मालकिनीच्या हातात सोडला जीव; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

हा व्हिडीओ पाहून सर्वच हळहळ व्यक्त करत आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत अग्निशमन दलाचे जवान एकाच वेळी आग विझवण्याचं आणि आगीतून वाचलेल्यांना शोधण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in wedding hall during newlyweds dancing 100 people lost life many injured iraqi middle east video srk