आपल्या छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी एक बहीण मग ती वयाने कितीही लहान असली तरी काय करू शकते, याची प्रचिती नुकत्याच घडलेल्या घटनेतून आली आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जीवावर येते त्यावेळी आपण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतो. पण व्हायरल व्हिडीओमधल्या बहिणीने स्वतःचा जीव तर वाचवलाच पण भावाला सुद्धा मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधधला आहे. एका अपार्टमेंटमध्ये अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण घर या आगीच्या कचाट्यात सापडलं आणि बघता बघता सारं घर जळून खाक झालं. या घरात १८ वर्षांची मुलगी आणि तिचा १३ वर्षांचा भाऊ असे दोघे राहत होते. चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. अशा स्थितीत त्याच्याकडे पर्याय नव्हता, ते तिथून उडीही घेऊ शकत नव्हते. घराबाहेर पडण्याचा कोणताह मार्ग त्यांना सापडत नव्हता. घरात आग वेगाने पसरत होती हे पाहून दोघे भाऊ बहिण घराच्या खिडकीजवळ येऊन लटकले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नऊ महिन्याच्या बाळाचे ‘हे’ पहिले शब्द ऐकून फक्त पालक नव्हे तर तुम्ही सुद्धा चकित व्हाल

ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ ‘गुडन्यूज करस्पाँडंट’च्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या घटनेची माहिती देताना, व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, ‘१६ डिसेंबरच्या पहाटे २ वाजता एक १३ वर्षांचा मुलगा आणि एक १८ वर्षांची मुलगी राहत असलेल्या NYC मधील एका जळत्या इमारतीतून स्वतःला वाचवलं.” या व्हिडीओमध्ये, सुरूवातीला बहिण इमारतीच्या खिडकीला लटकते आणि नंतर उभं राहून आपल्या भावाला खांबाला धरून त्याला बाहेर काढताना दिसून येते.

कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे की, “आगीच्या मोठ मोठ्या ज्लाळा भडकत असताना बहिण तिच्या भावाला खांबावरुन खाली येण्यासाठी सांगते. या दोघांनाही इमारतीखाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आगीमुळे एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना वाचवण्यात यश आलं आहे. दोन्ही भावंडांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.”

आणखी वाचा : जेव्हा तीन खतरनाक किंग कोब्रांमध्ये बैठक होते…VIDEO VIRAL पाहून लोक म्हणाले, “गंभीर चर्चा सुरूये”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : विषामुळे नव्हे तर सौंदर्यामुळे चर्चेत आलाय हा विषारी साप, काय आहे रहस्य, पाहा VIRAL VIDEO

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे. ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : स्टंट करण्याच्या नादात तोंडावरच आपटला, VIRAL VIDEO पाहून नेटकरी हादरले…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत दोन्ही भावंडांची आई गंभीर जखमी झाली आहे. आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर चार मिनिटांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पण, डेलीमेलच्या वृत्तानुसार, भावंडं स्वतःहून खाली उतरण्यात यशस्वी झालं. २५ ते ३० सेकंदात ते सुरक्षितपणे इमारती खाली पोहोचले.

Story img Loader