दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात. पण गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीचे स्वरुप बदलले आहे. आता दिवाळी म्हणजे फटक्यांचे आतिषबाजी असे चित्र पाहायला मिळते. या फटक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण हा तर एक वेगळा मुद्दा आहेच पण अनेकदा फटक्यांमुळे अनेक अपघातही होतात. योग्य काळजी घेऊन फटाके न वाजवल्यास अनेकदा आग लागल्याच्या घटना घडतात. दरम्यान अशीच एक घटना उघडकीस आली आहे. दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एलुरू शहरात गुरुवारी एका फटाक्यांचा स्फोट झाल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.
दिवाळी साजरी करण्यासाठी खरेदी केलेल्या फटाक्यांची पिशवी दोन जण घेऊन जात असताना ही घटना घडली.
“सुतळी” आणि इतर फटाके असलेली पिशवी रस्त्यावर पडल्यानंतर स्फोट झाला, परिणामी दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासाच्या आधारे पीटीआयला सांगितले. दुचाकीस्वार आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले इतर दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा –ऐन दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, धक्कादायक घटनेचा Video Viral
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा धक्का इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचे पाय आणि शरीराचे इतर भाग छिन्नविछिन्न झाले. टीव्ही चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कथितपणे स्फोट झाला आणि काही लोक परिसरात धुळीसह पळताना दिसत आहेत.
मारुती नगर येथील डी. सुधाकर असे मृताचे नाव आहे. या स्फोटात परिसरातील पाच जण जखमी झाले आहेत. सुधाकर आणि अन्य एक व्यक्ती त्यांच्या दुचाकीवर बारीक गोणीत फटाके घेऊन जात असताना हा अपघात झाला.
गृहनिर्माण मंत्री कोलुसू पार्थसारथी, एलुरुचे आमदार बडेती राधाकृष्ण (चंटी) आणि इतरांनी शुक्रवारी मारुती नगरमध्ये पीडितांची भेट घेतली.
मंत्र्यांनी पीडित कुटुंबातील एकाला आउटसोर्सिंग आधारावर नोकरी देण्याचे आश्वासन दिले, एलुरु महानगरपालिकेकडून ₹ २ लाख आणि टीडीपीकडून ₹१ लाख देण्यात आले.
हेही वाचा – “सगळं काही बाबांसाठीं”, इवल्या इवल्या हातांनी लाडक्या लेकीने लाटली चपाती, गोंडस चिमुकलीचा Video Viral
त्यानंतर मंत्री व आमदार यांनी शासकीय सामान्य रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. श्री पार्थसारथी यांनी डॉक्टरांना पीडितांना चांगले उपचार देण्याचे निर्देश दिले.
यावेळी मंत्र्यांसोबत महापौर शेख नूरजहाँ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा घनता पद्मश्री आदी उपस्थित होते.