दिल्ली हे शहर भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळेच दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीमध्ये फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही हरियाणा येथील गुरुग्राम येथे एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. काही तरुणांनी चालत्या कारमधून फटाके फोडून आतिषबाजी केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२४ ऑक्टोबरला गुरुग्राम येथील एका रस्त्यावर काही तरुण रात्रीच्या वेळी चालत्या कारमधून हवेमध्ये फटाके फोडत होते. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या तरुणांना आता ताब्यात घेण्यात आले आहे. दिवाळीच्या रात्री काही तरुणांनी चालत्या गाडीवर स्काय शॉट लावले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा माग काढला आणि त्यांना अटक केली.
जीव वाचवण्यासाठी तब्बल सहा तास फ्रिजमध्ये बसून राहिला अन्…; पाहा नेमकं काय घडलं
नकुल, जतीन आणि कृष्णा अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी दिल्लीच्या डीएलएफ फेज ३ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि सिकंदरपूर येथून या तीनही तरुणांना अटक करण्यात आली.
फायर हेअरकट करणं तरुणाच्या जीवावरच बेतलं; Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप
दिवाळीच्या आधी, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले होते की दिवाळीच्या दिवशी राष्ट्रीय राजधानीत फटाके फोडल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि २०० रुपये दंड होऊ शकतो. असे असतानाही दिवाळीच्या दिवशी येथील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत फटाक्यांचा आनंद लुटला. याच अनुषंगाने दिल्ली पोलिसांनी दिवाळी आणि आधीच्या चार दिवसांत शहरात फटाके फोडण्याच्या घटनांसंबंधी १६ गुन्हे दाखल केले आले आहेत. तर, फटाके विक्रीचे ५८ गुन्हे दाखल केले असून एकूण २,८३४.१३ किलो फटाके जप्त केले आहेत.