सोशल मीडियावर कर्मचारी आणि त्यांचे बॉस किंवा कंपनीशी संबंधित अनेक वेगवेगळ्या घटना व्हायरल होत असतात. यामध्ये कधी कर्मचाऱ्याने रागारागाने दिलेला राजीनामा, तर कधी कंपनीने कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकल्याच्या घटनांचा समावेश असतो. शिवाय असे अनेक कर्मचारी असतात जे त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या अशाच एका कर्मचाऱ्याने त्याला कंपनीने कामावरुन काढून टाकल्यानंतर त्याने कंपनीचं मोठं नुकसान केलं आहे. शिवाय आपण ते जाणूनबुजून कंपनीचं नुकसान का केलं? याबाबतची माहिती त्याने Reddit वर शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

r/MaliciousCompliance नावाच्या वापरकर्त्याने ही पोस्ट केली आहे. त्याने सांगितले की कंपनीने त्याला एका झटक्यात कामावरुन काढून टाकलं आणि नंतर कंपनीचा लॅपटॉप परत करायला सांगितलं, तेही कुरिअरद्वारे. त्यामुळे रागवलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीचा चांगलाच बदला घेतला, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी या व्यक्तीने केलेलं कृत्य योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर या वापरकर्त्याने त्याला कामावरुन काढून टाकल्यावर नेमकं काय केलं, ज्यामुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे, ते जाणून घेऊया.

हेही पाहा- प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून तरुणाचा विचित्र रोमान्स; VIDEO पाहून संतापले नेटकरी, पोलिसांनी केली मोठी कारवाई

Reddit वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कर्मचाऱ्याने लिहिलं, “नुकतेच कंपनीने मला कामावरुन काढून टाकलं, आता माझा HR बरोबरचा शेवटचा व्हिडिओ कॉल झाला, यानंतर त्यांनी माझ्याकडून सर्व एक्सेस काढून घेतले. त्यांनी मला माझ्या लॅपटॉपमधील वैयक्तिक डेटा घेण्यासाठीही वेळ दिला नाही किंवा त्यांनी मला कोणाचा निरोप घेण्याची संधीही दिली नाही. ते अतिशय वाईटरित्या माझ्याशी वागले. त्यानंतर त्यांनी मला लवकरात लवकर कंपनीचा लॅपटॉप परत पाठवायला सांगितलं आहे. मी लॅपटॉप परत पाठविण्यासाठी कुरिअर कंपनी शोधण्यात माझा वेळ वाया घालवावा अशी कंपनीची अपेक्षा होती. एखाद्याला अचानक कामावरुन काढून टाकल्यावर कंपनी हे सर्व करायला कसे सांगू शकते?”

शिपिंगचा खर्च लॅपटॉपपेक्षा जास्त –

त्याने पुढं लिहिलं की, कंपनीने मला त्यांच्या शिपिंग अकाऊंटचा कोड दिला आणि या अकाऊंटमधून मी पैसे वापरु शकतो असं सांगितलं. परंतु त्यांनी दिलेला कोड काम करत नसल्याने मला शहरभर हिंडावं लागलं. इतकेच काय, मला माझ्या स्वतःच्या खिशातून शिपिंगसाठी पैसे द्यावे लागले, जे मला अजिबात आवडंल नाही. मात्र, ‘तुम्ही पेमेंट करा आम्ही तुमचे पैसे परत देऊ’ असे कंपनीने सांगताच, मी शिपिंगची सर्वात महाग पद्धत निवडली आणि बॉक्सचे वजन जास्त करण्यासाठी लॅपटॉपसह त्या शिपिंगच्या बॉक्समध्ये बाथरूमच्या टाइल्स ठेवल्या. शिवाय मी माउस आणि इतर वस्तू स्वतंत्रपणे पाठवल्या. ज्यामुळे शिपिंगची रक्कम वाढली, तर ती एकूण किंमत ८४० डॉलर म्हणजेच जवळपास ७० हजार रुपये इतकी झाली. तर लॅपटॉपची किंमत ५०० डॉलर म्हणजेच ४२ हजार रुपये इतकी होती. असो त्यांनी मला सांगितल्याप्रमाणेच मी केलं.”

कर्मचाऱ्याने कंपनीचं एवढं नुकसानं केलं आहे, ज्याची कंपनी कल्पनादेखील करु शकतं नाही. शिवाय कंपनीने कामावरुन काढून टाकल्याचा कर्मचारी असा बदला घेईल असा विचारही कंपनीने कधी केला नसेल, असं नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fired by company without notice angry employee retaliated in a unique way you will be surprised to read the case reddit post viral jap
Show comments