अफगाणिस्तान तालिबानमुळे पुरता उद्धवस्त झालेला देश. या देशात मानवी हक्कांची सरळ सरळ पायमल्ली केली जाते तिथे महिला हक्क आणि महिला स्वातंत्र्य यांची गोष्टच काढायला नको. महिलांना शिकण्यापासून ते बाहेर फिरण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवर बंदी. महिलांनी बुरखा घालून त्यातूही पूर्णपणे अंग झाकून बाहेर पाडायचे. चूल आणि मुल सांभाळायचं अशा संकुचित विचारांचे लोक येथे आहे. अशा वातावरणात अफगाण महिलांनी धाडस करून स्वत:चा ऑर्केस्ट्रा बँड स्थापन केला. गेल्याच आठवड्यात दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये त्यांनी जगासमोर आपली संगिताची कला दाखवली.

वाचा : अफगाणच्या पहिल्या वैमानिकेने मागितला अमेरिकेकडे आश्रय

आज जगात महिलांचे अनेक ऑर्केस्ट्रा बँड असतील, पण ‘झोहरा’ हा ऑर्केस्ट्रा बँड या सगळ्यांहूनही वेगळा आहे. कारण जिथे महिलांना कस्पटासमान वागणूक दिली जाते, जिथे महिलांचे हक्क पायदळी तुडवले जातात अशा ठिकाणी समाजाविरुद्ध बंड करून अफगाणिस्तानच्या महिलांनी हा बँड स्थापन केला आहे. अफगाणिस्तानमध्ये आजही मनोरंजनाच्या कार्यक्रमावर बंदी आहे . शरिया कायद्यात हे बसत नाही असे सांगत मनोरंजनाच्या अनेक गोष्टींवर कट्टरपंथींयांनी बंदी घातली आहे. ज्या देशात आजही मुलींना शिक्षणाचा हक्क नाकारला जातो तिथे सारे बंध झुगारून या महिलांनी आपला ऑर्केस्ट्रा बँड स्थापन केला. या सगळ्या बँडमध्ये १३ ते २० वयोगटातील मुली आणि महिलांचा समावेश आहे. या सगळ्या अफगाणिस्तानमधल्या गरीब कुटुंबात जन्मला आल्या आहेत.

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत

या बँडची संस्थापक नेगिना हिला या धाडसाबद्दल अनेकदा तिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. कुटुंबियांनी देखील तिला साथ देणे नाकारले पण तरीही कट्टरपंथीयांच्या धमक्यांना भिक न घातला नेगिनान झोहरा ऑर्केस्ट्रा बँड सुरु ठेवला. स्विर्त्झलँडमधल्या दावोस येथे लाखों प्रेक्षक, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी आपली कला सादर केली.

Story img Loader